कुटुंब नियोजन ही प्रत्येक दाम्पत्याची जबाबदारी

44

कुटुंब नियोजन ही प्रत्येक दाम्पत्याची जबाबदारी

जागतिक लोकसंख्या दिन जिल्हास्तरीय उद्घाटन प्रसंगी मार्गदर्शन

 घुग्घुस:आरोग्य विभाग जिल्हा परिषद, चंद्रपूर अंतर्गत प्राथमिक आरोग्य केंद्र, घुग्घुस येथे ११ जुलै जागतिक लोकसंख्या दिन जिल्हास्तरीय कार्यक्रमाचे विधीवत दीप प्रज्वलन करुन उद्घाटन डॉ. प्राची नेहुलकर, माता बाल संगोपन अधिकारी, जि.प. चंद्रपूर, यांचे शुभहस्ते प्रा.आ.केंद्र, घुग्घुस येथे पार पडले.
याप्रसंगी मंचावर डॉ. प्रीती राजगोपाल, वैद्यकिय अधिकारी, जिल्हा प्रशिक्षण पथक, चंद्रपूर श्रीमती उज्वला सातपुते, जिल्हा विस्तार व माध्यम अधिकारी, जि.प.चंद्रपूर, डॉ. मुनेश्वर, तालुका आरोग्य अधिकारी, चंद्रपूर डॉ. निलेश पडगेलवार, वैद्य. अधिकारी, प्रा.आ.केंद्र, घुग्घुस, डॉ. अनघा उंदीरवाडे, वैद्य. अधिकारी, प्रा.आ.केंद्र, घुग्घुस, डॉ. अंशीता कुंडू, वैद्य. अधिकारी, प्रा.आ.केंद्र, घुग्घुस यावेळी उपस्थित होते.
सदर जागतिक लोकसंख्या दिन जिल्हास्तरीय कार्यक्रमाचे आयोजन मा. विवेक जॉनसन , मुख्य कार्यकारी अधिकारी, जि.प. चंद्रपूर यांचे विशेष मार्गदर्शनाखाली व डॉ. अशोक कटारे, जिल्हा आरोग्य अधिकारी, जि.प. चंद्रपूर यांचे नियोजनाखाली करण्यात आले.
यावेळी कार्यक्रमाचे उद्घाटनपर मार्गदर्शनात, डॉ. प्राची नेहुलकर, यांनी वाढत्या लोकसंख्येमुळे मानवी जिवनावर होणा-या परिनामाबाबत विशेष मार्गदर्शन केले. तसेच लोकसंख्या नियंत्रणाकरीता विवाहीत दाम्पत्यांनी प्राथमिक आरोग्य केंद्रातील कुटुंब कल्याण साधनांचा वापर करावा व कुटुंब नियोजन ही प्रत्येक दाम्पत्याची जबाबदारी आहे. असे सांगीतले.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक मार्गदर्शन डॉ. निलेश पडगेलवार, वैद्य. अधिकारी, प्रा.आ.केंद्र, घुग्घुस, यांनी केले. कार्यक्रमाचे संचालन संतोष बोरीकर, आ. सहा. तर आभार प्रदर्शन ज्योशना खिरडकर, आ. सेविका, प्रा.आ. केंद्र घुग्घुस यांनी केले.
कार्यक्रमाप्रसंगी कार्यक्रम यशस्वीतेकरीता जिल्हास्तरावरील आरोग्य विभागातील सुभाष सोरते, आर्टीस्ट, प्रियंका चुंचुवार, वि.अ.सां., किशोर मोते आ. सहा. तसेच प्रा.आ.केंद्र घुग्घुस येथील अधिकारी, कर्मचारी व आशा स्वयंसेविका यांनी अथक परिश्रम घेतले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here