विनोद बरडे अधीसेवीका व सामाजिक कार्यकर्त्या प्रसिध्द अभीनेत्री सुधा चंद्रन यांच्या कळून सन्मानित
नागपुर :
दिनांक २१ जुलै २०२४ ला हा पुरस्कारांचा कार्यक्रम झाला त्या कार्यक्रमात वंदना विनोद बरडे अधीसेवीका व सामाजिक कार्यकर्त्या नागपूर यांना पुरस्कार महाराष्ट्राचा गौरव कर्तृत्वाचा या पुरस्काराने सन्मानित करण्यात आले.
हा कार्यक्रम कोणार्क हाँटेलमध्ये अविनाश बडगे यांनी आयोजित केला होता.या कार्यक्रमामध्ये ५०अवार्डींना पुरस्कुत करण्यात आले त्यामध्ये आरोग्य सेवांचे योगदान व सामाजिक कार्याचे योगदान या बद्दल हा पुरस्कार सुधा चंद्रन यांच्या हस्ते देण्यात आला.
यावेळी वंदना विनोद बरडे यांनी अवयव दान, नेत्र दान, देह दान, रक्त दान, करण्याचें आवाहन केले.तसेच आजकाल आत्महत्यांचे प्रमाण वाढले आहे तर आत्महत्या करू नये.त्याबद्दल मार्गदर्शन केले.जिवन किती सुंदर आहे हे यावेळी सुधा चंद्रन यांच्या जिवन कार्यावर प्रकाश टाकुन उदाहरणादाखल समजावून सांगितले.
सुधा चंद्रन यांनी कधींही हार मानली नाही.त्यांच्यावर किती बीकट परीस्थीती आली होती.त्यांनी त्यांवर मात करुन एक आदर्श जिवन जगत आहेत.त्या सर्वांच्या साठी आयडॉल आहे.आणी आरोग्य दायी संदेश दिलेत.