पावसाच्या झडीमुळे घर पडले
साहित्या सह दुचाकी ही मलब्या खाली दाबल्या गेली
कांग्रेस अध्यक्ष राजु रेड्डी घटणास्थळी भेट देऊन प्रशासनाशी नुकसान भरपाईची मांगणी केली
घुग्घूस : मागील आठ दहा दिवसापासून संपूर्ण चंद्रपूर जिल्ह्यात पावसाची झळ शुरु होती यामुळे नदी नाल्याना पूर येऊन याची झळ नागरिकांना बसलीच मात्र या पाण्यामुळे अनेक नागरिकांची घरे देखील कोसळल्याची घटना समोर आलेली आहे.

घुग्घूस शहरातील वॉर्ड क्रं 03 नगरपरिषदेच्या मागे राहणारे महेश दौलत नागपुरे यांचे घर काल रात्री अकरा वाजताच्या सुमारास पडले घरात कुणी नसल्याने जीवितहानी झाली नाही
मात्र घरातील साहित्याचा भांडी कुंडी दोन सायकील तसेच शेजारी राहणाऱ्या युवकांची हिरो होंडा वाहन मलब्या खाली दाबल्या गेल्याने प्रचंड असा आर्थिक नुकसान झाले आहेत
घटनेची माहिती मिळताच काँग्रेस शहर अध्यक्ष राजुरेड्डी जिल्हा सचिव अजय उपाध्ये यांनी घटनास्थळी भेट घेत नुकसानाची पाहणी करून पटवारी यांना सदर घराचे तातळीने पंचनामे करून नुकसान भरपाई देण्याची मागणी केलेली आहेत
यासोबतच शहरातील बँक ऑफ इंडिया परिसरातील घरांच्या भिंती पडून त्यांचे ही नुकसान झालेले आहेत
यागंभीर प्रकरणाकडे शासनाने तातळीने लक्ष देऊन नागरिकांना साहाय्य करावे अशी मागणी काँग्रेस अध्यक्ष राजुरेड्डी यांनी केली आहे
याप्रसंगी काँग्रेस नेते सैय्यद अनवर, सोशल मीडिया अध्यक्ष रोशन दंतलवार, अलीम शेख, बालकिशन कुळसंगे विशाल मादर, सुनील पाटील, शेहनशाह शेख व अन्य पदाधिकारी उपस्थित होते