ना. सुधीरभाऊ मुनगंटीवार सेवा केंद्रात स्वातंत्र्यदिन उत्साहात
घुग्घुस : शहरातील ना. सुधीरभाऊ मुनगंटीवार सेवा केंद्रात असंख्य देशभक्त नागरिकांच्या उपस्थितीत देशाचा स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा करण्यात आला.
भाजपा जिल्हा महामंत्री विवेक बोढे यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले. राष्ट्रगीत गाऊन तिरंगा झेंड्यास सलामी देण्यात आली. अनेकांनी देशभक्तीपर गीत गायन करून वातावरण देशभक्तीमय केले.
यावेळी भाजपा जिल्हा महामंत्री विवेक बोढे, जिल्हा सचिव विनोद चौधरी, भाजपाचे अमोल थेरे, साजन गोहने, चिन्नाजी नलभोगा, संजय भोंगळे, दिलीप कांबळे, तुलसीदास ढवस, दिनेश बांगडे, सांबशिव खारकर, रवी चुने, धनराज पारखी, सुरेंद्र जोगी, श्याम आगदारी, सुरेंद्र भोंगळे, मल्लेश बल्ला, मिलिंद पानघाटे, मंदेश्वर पेंदोर, संदेश पोलशेट्टीवार, अनिल नित, हेमराज बोंमले, प्रयास सखी मंच अध्यक्षा किरण बोढे, सुचिता लुटे, वैशाली ढवस, नंदा कांबळे, सुनीता पाटील, शारदा गोडसेलवार, किरण जुनघरे आदी उपस्थित होते.