घुग्घुस शहरात लाडक्या बहिणींना ३ हजार रुपये मिळणे सुरु
ना. सुधीरभाऊ मुनगंटीवार सेवा केंद्रात महिलांचा आनंदोत्सव
घुग्घुस : शहरातील लाडकी बहिण योजनेच्या लाभार्थी महिलांच्या खात्यात ३ हजार रुपये जमा होणे सुरु झाले आहे. त्यामुळे लाभार्थी महिलांमध्ये आनंदाचे वातावरण आहे. त्याअनुषंगाने ना. सुधीरभाऊ मुनगंटीवार सेवा केंद्रात लाडकी बहीण योजनेच्या पात्र लाभार्थी महिलांचे पुष्पगुच्छ देऊन स्वागत करण्यात आले तसेच लाडू वाटप करून आनंदोत्सव साजरा करण्यात आला.
याप्रसंगी पात्र लाभार्थी महिलांनी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, अजित पवार यांचे आभार व्यक्त केले.
मागील दोन दिवसापासून महाराष्ट्र शासनातर्फे लाडकी बहीण योजनेच्या लाभार्थी महिलांच्या बँक खात्यात जुलै व ऑगस्ट या दोन महिण्याचे ३ हजार रुपये टाकण्यात येत आहे.
महायुती सरकारने नुकतीच मुख्यमंत्री माजी लाडकी बहीण योजना जाहीर केली आहे. या योजनेंतर्गत लाभार्थी महिलांना दरमाह १ हजार ५०० रुपये देण्यात येणार आहे.
महाराष्ट्र शासनाची महत्वकांशी योजना लाडकी बहीण ही सुरु होताच या योजनेला महिलांचा उदंड प्रतिसाद मिळाला. घुग्घुस येथील ना. सुधीरभाऊ मुनगंटीवार सेवा केंद्रातर्फे लाडकी बहीण योजनेच्या जवळपास २,७०० लाभार्थी महिलांचे अर्ज स्वीकारण्यात आले तसेच १, ५०० लाभार्थी महिलांची ऑनलाईन नोंदणी करून देण्यात आली.
यावेळी प्रयास सखी मंच अध्यक्षा किरण बोढे, भाजपाच्या सुचिता लुटे, वैशाली भोंगळे, अमीना बेगम, सुनीता घिवे, सुनीता पाटील, नाजमा कुरेशी, सिमा पारखी, वंदना मुळेवार, माया चंदनखेडे, पुष्पा जानवे, आशा हजारे, सुरेखा दडमल, पुजा देशकर, सविता बांदूरकर, केतकी घोरपडे, अर्चना लेंडे, नंदा चिमुरकर, अर्चना बरडे, अमृता सोदारी, जोत्स्ना मडावी, सुनीता कुशवाह, गीता पाचभाई, सिमा दडमल, नम्रता सोदारी, शोभा रणदिवे, अर्चना बुंदे, शीतल रणदिवे, जायदा बेगम, बयना ठेपाले, माधुरी ठेपाले, अर्चना पोहीणकर आदींची उपस्थिती होती.