सक्षम इंग्लिश मिडीयम स्कूल च्या बालकांची मागणी बलात्कारांना फाशी द्या.

36

 

सक्षम इंग्लिश मिडीयम स्कूल च्या बालकांची मागणी बलात्कारांना फाशी द्या.

लहानग्या बालकांनी रॅली काढून सरकारला अत्याचाराची जाणीव करून दिली
_____________________________

वणी : नुकताच कलकत्ता आणि बदलापूर येथे मुलीवर अन्याय करण्यात आला असून हा प्रकार दिवसेंदिवस वाढताना दिसत आहे. यामुळे मानवतेची मान शरमेने झुकते आहे. वाढणारे हे प्रकार अत्यंत घृणीत असून या प्रकारावर कायदेशीर आळा बसणे गरजेचे आहे. म्हणून दिनांक 23/8/2024 ला सक्षम बहुउद्देशीय संस्था व सक्षम इंग्लिश मीडियम स्कूल च्या विद्यार्थ्यांनी एक निषेध रॅली काढून मा. उपविभागीय अधिकारी यांना निवेदन दिले.

आम्ही बालके असुरक्षित आहोत, जगणे हा आमचा अधिकार आहे, हा आमचा अधिकार आम्हाला मिळाला पाहिजे आणि जो कोणी अत्याचारी आमच्या या अधिकाराला संपवून टाकण्याचे प्रयत्न करेल अशा नराधमांना फाशीची शिक्षा करून आमच्यासाठी असुरक्षित असणारे वातावरण सुरक्षित करण्यासाठी कायदेशीर पायबंद घातला जावा म्हणून आम्ही बालके या बलात्कारी घटनेचा निषेध नोंदवून सरकारला लक्षात आणून देत आहोत की, “देश तो आजाद हुआ है बेटीया कब आजाद होगी?” हा सुचक प्रश्न उपस्थित करून या निर्दयी घटनेच्या विरोधात रॅली काढून सरकारला जाणीव करून देत आहोत.

या रॅलीचे नेतृत्व सक्षम बहुउद्देशीय संस्थेचे अध्यक्ष तथा सक्षम इंग्लिश मीडियम स्कूलच्या संचालिका कर्मा तेलंग यांनी केले असून या रॅलीमध्ये स्कूलचे सर्व विद्यार्थी , शिक्षिका उषा राजुरकर, नीता चलाख, अमरीन खान, स्नेहल चौधरी, स्नेहल भगत ,खुशबु मुरचीलिया, हर्षिता काटकर ,जया मेश्राम प्राजक्ता बेलेकर आणि यांच्यासोबत मा. गीत घोष, शंकर शेंडे, पुष्पाताई आत्राम, श्री पी डी आत्राम, पुरुषोत्तम सोयाम, मा. उत्तम रावजी गेडाम, रमेश मडावी, श्रीकृष्ण मडावी, मनोज काळे, रामदास गेडाम, भाऊराव आत्राम, महेश आत्राम, तसेच विद्यार्थ्यांचे पालक वर्ग प्रामुख्याने उपस्थित होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here