भारतीय लॉयड्स मेटल्स कामगार संघाचे ६ वे त्रिवार्षिक अधिवेशन संपन्न
घुग्घुस : येथील भारतीय लॉयड्स मेटल्स कामगार संघाचे ६ वे त्रिवार्षिक अधिवेशन शनिवार, २४ ऑगस्ट रोजी सकाळी ११ वाजता प्रयास सभागृहात संपन्न झाले.
कार्यक्रमाचे उद्घाटक महामंत्री भामस विदर्भ प्रदेश गजानन गटलेवार, अध्यक्ष भामस चंद्रपूर बंडू हिवरे, प्रमुख पाहुणे म्हणून भाजपा जिल्हा महामंत्री विवेक बोढे, माजी अध्यक्ष विदर्भ प्रदेश रमेश बल्लेवार, विभाग संघटनमंत्री विदर्भ प्रदेश विवेक अल्लेवार, जिल्हामंत्री भामस चंद्रपूर पवन ढवळे, भारतीय लॉयड्स मेटल्स कामगार संघ घुग्घुसचे कार्याध्यक्ष प्रमोद येलचलवार, कोषाध्यक्ष विठ्ठल ठाकरे मंचावर उपस्थित होते.
याप्रसंगी प्रमुख पाहुण्यांचे स्वागत पुष्पगुच्छ देऊन करण्यात आले तसेच प्रमुख पाहुण्यांनी आपले मनोगत व्यक्त केले.
याप्रसंगी कामगार संघटनेच्या अध्यक्ष पदी विवेक अल्लेवार यांची नियुक्ती करण्यात आली.
यावेळी मोठया संख्येत पदाधिकारी व कामगार उपस्थित होते.