चंद्रपूर जिल्हा काँग्रेस महासचिवपदी अलीम शेख तर तालुका सचिवपदी विशाल मादर यांची नियुक्ती
चंद्रपूर : महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमेटीच्या प्रांताध्यक्ष नाना पटोले खासदार प्रतिभा धानोरकर व काँग्रेस कमेटीचे जिल्हाध्यक्ष आमदार सुभाष धोटे यांच्या यांच्या आदेशाने घुग्घूस काँग्रेस कमेटीचे ज्येष्ठ नेते अलीम मैनूदिन शेख यांची चंद्रपूर जिल्हा काँग्रेस कमेटीच्या जिल्हा महासचिव पदावर नियुक्ती करण्यात आली तसेच चंद्रपूर तालुका काँग्रेस कमेटीच्या तालुका सचिव पदी युवा नेते विशाल मादर यांची नियुक्ती करण्यात आली.
आज 02 ऑक्टोबर राष्ट्रपिता महात्मा गांधी व माजी पंतप्रधान लाल बहादूर शास्त्री यांच्या जयंती प्रित्यर्थ आयोजित छोटयाखानी कार्यक्रमात जिल्हाध्यक्ष सुभाष धोटे व तालुकाध्यक्ष अनिल नरुले यांच्या हस्ते नियुक्तीपत्र देण्यात आले. शेख व मादर यांच्या नियुक्ती करीता काँग्रेस अध्यक्ष राजुरेड्डी यांनी विशेष प्रयत्न केले या दोन्ही नेत्यांच्या नियुक्तीने होऊ घातलेल्या विधानसभा निवडणुकीत काँग्रेस पक्षाला भरघोस अशी मदत मिळेल.
काँग्रेस पदाधिकाऱ्यांच्या नियुक्ती नंतर काँग्रेस नेते सैय्यद अनवर, सोशल मीडिया अध्यक्ष रोशन दंतलवार, ज्येष्ठ नेते जयंता जोगी, शामराव बोबडे, माजी उपसरपंच सुधाकर बांदूरकर, ज्येष्ठ नेते लक्ष्मण सदलावार, मोसीम शेख, शामिउद्दीन शेख, जिल्हा सचिव अजय उपाध्ये, इंटक जिल्हा उपाध्यक्ष शहजाद शेख, अनिरुद्ध आवळे,एन. एस. यु. आय शहर अध्यक्ष आकाश चिलका,रोहित डाकूर, नुरूल सिद्दीकी,अविनाश बोबडे,दिपक पेंदोर, बालकिशन कुळसंगे, विजय माटला, कुमार रुद्रारप,सुनील पाटील,अरविंद चहांदे,दिपक कांबळे, कपिल गोगला, भैय्या भाई, सैदू भाई, देव भंडारी,अंकुश सपाटे, तन्मय गहुकार यांनी शुभेच्छा देत स्वागत केले