स्थानिक गुन्हे शाखा, चंद्रपुर यांची अवैद्य सुगंधीत तंबाखुची विक्री करणार्यावर कारवाई
चंद्रपुर जिल्हयात अवैद्यरित्या सुगंधीत तंबाखु कार्यवाही करणे बाबत मा. पोलीस अधीक्षक श्री. मुम्मका सुदर्शन, मा. अमर पोलीस अधीक्षक रिना जनबंधु यांनी स्थानिक गुन्हे शाखा चंद्रपुर येथिल पोलीस निरीक्षक श्री. महेश कोंडावार यांचे मार्गदर्शनाखाली स्था.गु.शा. पथकांना आदेशीत केले होते.
मा. पोलीस निरीक्षक श्री. महेश कोंडावार यांनी स्थानिक गुन्हे शाखेचे पथकांना शहरात प्रभावी • पेट्रोलींग करून अवैध्यरित्या सुगंधीत तंबाखु कार्यवाही करण्याचे निर्देश दिल्याने दिनांक 04/10/2024 रोजी स्थानिक गुन्हे शाखेचे पथक यांनी गोपनीय बातमीदाराचे माहीती वरून स्थागुशा. येथिल अधिकारी व कर्मचारी पो.स्टे. गोंडपिपरी हददीमध्ये पेट्रोलींग करीता असतांना मुखबिर व्दारे खबर मिळाली की, गजानन शंकर तेल्कापल्लीवार, वय-54 वर्ष, धंदा-पान मटेरीअल विकी रा. वार्ड क्रमांक 1 करंजी ता. गोंडपिपरी जि चंद्रपुर • व दुकाण आलापल्ली मेनरोड गोंडपिपरी, ता. गोंडपिपरी, जिल्हा चंदपुरयाचे श्री. लक्ष्मीनंदन ट्रेडस दुकाणामध्ये अवैध्यरित्या सुगंधीत तंबाखु बाळगुण विकी करीत आहे अश्या खबरेवरून दुकाणात छापा. मारला असता दुकाणाचे मागचे खोलीत व मालवाहु वाहणामध्ये अवैध्यरित्या सुगंधीत तंबाखु मिळुन आला वाहन व मुददेमाल असा एकुण 4,71,880/-रू. चा माल जप्त करून आरोपी विरूध्द पो.स्टे. गोंडपिपरी येथे अपराध क्रमांक 280/2024 कलम 223, 275, 123 भा.न्या.सं. सहकलम 30 (2) 26(2) (पअ), 3, 4, 59 अन्न सुरक्षा आणि मानके अधिनियम 2006 अन्वये गुन्हा नोंद करण्यात आला आहे.
सदर कर्यवाही स्थानिक गुन्हे शाखा’ चंद्रपुर येथिल पोलीस निरीक्षक श्री. महेश कोंडावार यांचे मार्गदशनात पोउपनिः मधुकर सामलवार, पो.हवा. जयंत चुनारकर, सुभाष गोहोकार, चेतन गज्जलवार, पोअं.किशोर वाकाटे, अमोल सावे यांनी केली आहे.