एफ ई एस गर्ल्स महाविद्यालयात संविधान दिन कार्यक्रम संपन्न

10

एफ ई एस गर्ल्स महाविद्यालयात संविधान दिन कार्यक्रम संपन्न


चंद्रपूर, दि. 26 : फिमेल एज्युकेशन सोसायटी चंद्रपूर व्दारा संचालित एफ ई एस गर्ल्स महाविद्यालय येथील राष्ट्रीय सेवा योजना विभाग व्दारा महाविद्यालयातील प्रभारी प्राचार्य डॉ. राजेश चिमनकर यांच्या मार्गदर्शनाखाली रासेयो कार्यक्रम अधिकारी प्रा. डॉ. राजेंद्र बारसागडे व सह कार्यकम अधिकारी प्रा डॉ मेघमाला मेश्राम यांनी संविधान दिन कार्यक्रमाचे आयोजन केले.

कार्यक्रमा प्रसंगी महाविद्यालयाचे प्रभारी प्राचार्य डॉ राजेश चिमनकर यांच्या हस्ते डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेस पुष्पमाला अर्पण करण्यात आले व उपस्थित प्राध्यापक व शिक्षकेतर कर्मचारी यांनी डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेस अभिवादन केले.

महाविद्यालयाचे प्रभारी प्राचार्य डॉ राजेश चिमनकर यांनी भारतीय संविधान हे जगातील सर्व श्रेष्ठ संविधान आहे. संविधानानी देशाला स्वातंत्र्य समता बंधुत्व न्याय हे मुल्य दिले असे विचार व्यक्त केले.

संविधान दिन कार्यक्रमा प्रसंगी संविधानाचे वाचन प्रा डॉ मेघमाला मेश्राम रासेयो कार्यक्रम अधिकारी यांनी संविधानाचे वाचन केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा डॉ राजेंद्र बारसागडे व आभार प्रा डॉ मेघमाला मेश्राम यांनी मानले
कार्यक्रमास महाविद्यालयातील प्राध्यापक डॉ मिनाक्षी ठोंबरे, प्रा.डाॅ. प्रज्ञा जुनघरे, प्रा.अशोक बनसोड, प्रा डॉ आनंद वानखेडे, शिक्षकेतर कर्मचारी व विद्यार्थिनीची मोठ्या प्रमाणात उपस्थित होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here