लैंगिक शोषण प्रकरणातील पीडित बालिकेसह आरोपी वर्ध्यातून ताब्यात!
घुग्घुस (चंद्रपूर): पोस्टे घुग्घुस येथे दाखल असलेल्या अपराध क्रमांक 89/025 कलम 137(2) भारतीय न्याय संहिता (BNS) अंतर्गत लैंगिक शोषण प्रकरणातील पीडित बालिका आणि आरोपीला घुग्घुस पोलिसांनी वर्धा जिल्ह्यातून ताब्यात घेतले आहे.
पोलिसांना दिनांक ०५ मे २०२५ रोजी गोपनीय माहिती मिळाली होती की, पीडित बालिका ही आरोपीसोबत वर्धा जिल्ह्यातील कपाशी, राळेगाव येथे आहे. या माहितीच्या आधारे,. सुधाकर यादव साहेब, उपविभागीय पोलिस अधिकारी (SDPO), चंद्रपूर यांच्या आदेशानुसार आणि. प्रकाश राऊत साहेब, पोलिस निरीक्षक यांच्या मार्गदर्शनाखाली विशेष पथक तयार करण्यात आले. सहाय्यक पोलिस निरीक्षक (API) सचिन तायवाडे यांच्या समन्वयाने तयार करण्यात आलेल्या या पथकात सहाय्यक पोलिस निरीक्षक (API) योगेश पाटील, पोलिस हवालदार अनिल बैठा आणि पोलिस शिपाई अलकेश सावंत यांचा समावेश होता.
या पथकाने तातडीने त्याच रात्री वर्धा जिल्ह्यात रवाना होऊन वर्धा शहर पोलिस ठाण्याच्या हद्दीतून पीडित बालिका आणि आरोपीला ताब्यात घेतले. त्यानंतर त्यांना चंद्रपूर येथे आणण्यात आले.
आज दिनांक ०६ मे २०२५ रोजी पोलिसांनी पीडित बालिकेचे बयान नोंदवले, ज्यात तिचे लैंगिक शोषण झाल्याचे स्पष्ट झाले. त्यामुळे या गुन्ह्यातील आरोपी मधुकर बापूराव समर्थ, वय ४८ वर्षे, रा. घुग्घुस, चंद्रपूर याच्याविरुद्ध वाढीव कलम 64, 64(2)(M) भा.द.वि. आणि सहकलम 4, 6 पोक्सो कायद्यान्वये वाढ करण्यात आली आहे.
आरोपी आणि पीडितेची वैद्यकीय तपासणी करण्यात आली असून, पुढील अधिक तपास घुग्घुस पोलिस करीत आहेत, अशी माहिती पोलिसांनी दिली आहे. या कारवाईमुळे पीडित बालिकेला न्याय मिळण्याची शक्यता वाढली आहे.