RCCPL सिमेंट कंपनी माँइन्स परसोडा येथे तूर्तास आंदोलन रद्द करण्यात आले
कोरपणा: तहसीलदार यांच्या उपस्थितीत RCCPL सिमेंट कंपनी यांचे अधिकारी व सरपंच उपसरपंच सदस्य व इतर यांच्या उपस्थितीत मौजा परसोडा रस्त्याचे परसोडा परसोडा नवीन व कोठोडा खु ह्या रस्त्याचे बांधकाम करणे लांबी अंदाजे 2.800किमी व CSR फंडातून नाली बांधकाम व सिमेंट रस्त्याचे बांधकाम परसोडा परसोडा नवीन कोठोडा खु रायपूर व गोविंदपूर येथील ग्राम पंचायत परसोडा यांनी प्रस्तावित केलेले कामे पूर्ण करून देण्याची मागणी ग्राम पंचायत सरपंच उपसरपंच व सदस्य यांनी केली ती वरील कामे पूर्ण करून देण्याची लेखीस्वृपात RCCPL सिमेंट कंपनी यांच्या अधिकारी हम्मी दिल्यामुळे दिनांक 7/5/2025 ला होणारे आंदोलन सध्या तूर्तास रद्द करण्यात आले आहे.
जर कालावधी मध्ये वरील कामे पूर्ण न केल्यास पुन्हा आंदोलन करण्यात येईल असे आवाहन करण्यात आले.
लेखी स्वरूपात अर्ज सादर करण्यात आले. उत्तम पेचे अध्यक्ष तालुका काँग्रेस कमिटी कोरपना सौ गिर्जाताई रामभाऊ कोहचाडे सरपंच , सतीश गोंलावार, उपसरपंच गणेश मडावी ,सदस्य संदीप मडावी व इतर मान्यवर उपस्थितीत होते.