स्मार्ट ग्राम मंगी ( बु ) येते शिक्षक दिन सोहळ्याचे उत्साहपूर्ण आयोजन

28

स्मार्ट ग्राम मंगी ( बु ) येते शिक्षक दिन सोहळ्याचे उत्साहपूर्ण आयोजन



नितेश केराम
मंगी ( बु ) ता 5 सप्टेंबर : स्मार्ट ग्राम मंगी ( बु ) येतील जिल्हा परिषद उच्च प्राथमिक शाळेत शिक्षक दिन सोहळा मोट्या उत्साहात साजरा करण्यात आला या सोहळ्यात विविध उपक्रमांच्या माध्यमातून विद्यार्थीनी गुरुजनांप्रती कृतज्ञता व्यक्त केली
शिक्षक दिनाच्या निमित्ताने एक दिवस आधीच स्वयंशासन उपक्रमांतर्गत विद्यार्थीनी शिक्ष कांची भूमिका पार पाडत अध्यापनाचे दायित्व निभावले या उपक्रमामुळे विद्यार्थी शिक्षक व्यवसायाची प्रत्येक्ष अनुभवात्मक जाणीव झाली तसेच शिस्त जबाबदारी व अध्यापन कौशल्य आत्मसात करण्याची संधी मिळाली शिक्षकाची भूमिका निभावलेल्या विद्यार्थीना शाळेतर्फे नोटबुक व पेन भेट देण्यात आले
मुख्य सोहळ्यात ग्राममस्त पालक व शाळा व्यवस्थापन समितीच्या उपस्थितीत शिक्षकांचा जाहिर सत्कार करण्यात आला समाजातील सैक्षणिक कार्याचा गौरव करण्यासाठी शिक्षकांना पुष्पगुछ शाल श्रीफळ व सन्मानपत्र देऊन गौरविण्यात आले
या प्रसंगी स्मार्ट ग्राम मंगी (बु ) चे सरपंच शंकर तोंडासे उपसरपंच वासुदेव चापले शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष मेंगोराव कोडापे ग्राम विकास समितीचे अध्यक्ष परशुराम तोंडासे शाळा व्यवस्थापन समितीचे सदस्य शरद पुसाम अंगणवाडी सेविका शारदाताई क्षीरसागर व भीमबाई कनाके शिक्षण परी सैला मडावी अंबुजा फाऊंडेशनचे क्रीडा मार्गदर्शक प्रगती ठोंबरे शाळेचे मुख्यद्यापक मारोती चापले इतर शिक्षक व पालक उपस्थित होते शिक्षक पालक व ग्रामस्थाच्या उपस्थितीमुळे सोहळ्याला विशेष उत्साह प्राप्त झाला

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here