युथ मुव्हमेन्ट ऑफ महाराष्ट्रतर्फे चंद्रपूरमध्ये आयोजित रक्तदान शिबिराला भरपूर प्रतिसाद, 131 दात्यांचे रक्तदान
प्रेषित जयंती निमित्त प्रेषितांच्या शिकवणीतून प्रेरित मेगा ब्लड डोनेशन कैंपचे आयोजन
चंद्रपूर : ज्याने एका व्यक्तीचे प्राण वाचवले त्याने संपूर्ण मानवतेचे प्राण वाचवले, तुमच्यात सर्व श्रेष्ठ ती व्यक्ती आहे जे लोकांच्या कामी येते, जन सेवेने अल्लाहचे सानिध्य प्राप्त होते. पैगंबराच्या या शिकवणीला समोर ठेवून एकमेव अल्लाहचे अंतिम प्रेषित, मानवतेचे उपकारक हजरत मुहम्मद पैगंबर (सल्लम) यांचे ईद मिलाद (प्रेषित जयंती) निमित्त युथ मूव्हमेंट ऑफ महाराष्ट्र या युवा संघटनेतर्फे मागील 17 वर्षांपासून महाराष्ट्रभर रक्तदान शिबिर घेन्यात येते .
यावर्षी देखील महाराष्ट्रात ६० हून अधिक ठिकाणी रक्तदान शिबिरे आयोजित करण्यात आली आहेत.
चंद्रपुरमध्ये ही शुक्रवारी दि. 05 सप्टेम्बर 2025 रोजी जटपुरा गेट येथे रक्तदान शिबिर घेण्यात आले. या शिबिरात तब्बल 131 दात्यांनी रक्तदान केले. रक्त संकलनाचे कार्य शासकीय रक्तपेढी चंद्रपूर तसेच शौऱ्या रक्तपेढी चंद्रपूर यांनी केले. या प्रसंगी शिक्षक आमदार सुधाकर अडबाले, चंद्रपूर पोलीस अधीक्षक मुमक्का सुदर्शन, प्रा. दुशांत नगराळे, अब्दूलरहमान पटेल, रिझवान पटेल, नाहीद हुसेन, अमित वाघमारे, सैय्यद झिया आदी मान्यवर उपस्थित होते. रक्तदान सर्वश्रेष्ठ दान आहे. एका रक्तदात्यामुळे तीन रुग्णांचे प्राण वाचु शकतात. आज महाराष्ट्राला जवळपास तीन ते पाच हजार रक्त युनिटची आवश्यकता असते. ही गरज फक्त रक्तदान शिबिराच्या मार्फत पूर्ण केली जाऊ शकते.
पैगंबरांच्या जन्मदिनाचा उद्देश रक्तदान शिबिर आयोजित करणे, म्हणजेच पैगंबरांच्या शिकवणींचे आचरण करणे हा आहे, असे वक्त्यांनी मत मांडले. सादिक खान, मोहम्मद इकबाल, मुजफ्फर बेग, मोहम्मद रेहान, डॉ इर्शाद, रिजवान सिवानी, राहिल मिर्झा, मुंतजीर खान, नावेद खान, अतिकुर रहमान, नबील खान, सबील खान, दानिश बेग, शोएब खान, दानिश खान, रेहान खान, सैय्यद मुंतजीर ,अयान खान सारख्या अनेक युवा कार्यकर्त्यांनी पुढाकार घेतला.
युथ मूवमेंट, चंद्रपूर युनिटचे अध्यक्ष जुनेद खान यांनी चंद्रपूर जनतेचे आभार व्यक्त केले.










