चंद्रपूर शहरातील झोपडपट्टी धारकांना निवासी प्रयोजनासाठी स्थाई जमिनीचे पट्टे देण्याची मागणी
_____________________________________________
चंद्रपुर: : राष्ट्रीय अनुसूची जाती जमाती आयोग हे भारतीय संविधानिक संस्था आहे. ती अनुसूचित जाती जमातीतील सार्वजनिक हिताचे संरक्षण आणि संवर्धन करतो. चंद्रपूर औद्योगिक शहर आहे. चंद्रपूर शहरामध्ये तीस चाळीस वर्षापासून झोपडपट्टीमध्ये राहत असलेल्या नागरिकांना शासनाने निवासी प्रयोजनासाठी अनुसूचित जाती जमाती नागरिकांना जमिनीचे पट्टे देण्याची व अनुसूचित जाती जमाती लोकांना सार्वजनिक शैक्षणिक, आर्थिक ,सांस्कृतिक हिताचे संरक्षण देण्याची मागणी माननीय एडवोकेट धर्मपाल मेश्राम साहेब उपाध्यक्ष राष्ट्रीय अनुसूचित जाती जमाती आयोग (महाराष्ट्र राज्य )यांना राष्ट्रीय मानवाधिकार संघटना जिल्हाध्यक्ष काशिनाथ बोरकर माननीय राष्ट्रपाल बुटले माननीय एडवोकेट अजित भडके प्रवीण नेल्लुरी यांच्या उपस्थित निवेदन देण्यात आले.










