Home Breaking News धानोली येथील नाल्यावरील पुलाचे बांधकाम करा

धानोली येथील नाल्यावरील पुलाचे बांधकाम करा

89

धानोली येथील नाल्यावरील पुलाचे बांधकाम करा



विजय रणदिवे माजी सरपंच यांची मागणी


कोरपना तालुक्यातील धानोली ते धानोली गुडा जोडणारा नाल्यावरील पूल पुर्न धोकादायक झाला आहे आजच्या घडीला केव्हाही पुलावर जीवित हानी होण्याची शक्यता नाकारता येत नाही तरी पुलाचे बांधकाम करण्यात यावे अशी मागणी माजी सरपंच विजय रणदिवे व ग्रामस्थांनी केली आहे
धानोली ते गुडा नाल्यावरील पुलाचे निर्मिती पंधरा वर्ष झाली या ठिकाणी प्राथमिक आरोग्य उपकेंद्र मशान भूमी तसेच कारगाव जोडरस्ता आदिवासी तीस कुटुंबे वास्तव्याला असून जवळपास पन्नास शेतकऱ्याची शेती याच भागात आहे त्यामुळे नाल्यावरील पूल हे या भागातील जनतेला येजा करण्यासाठी महत्वाचे आहे गेल्या दोन वर्षांपासून राष्ट्रीय महामार्गांसाठी या नाल्याचा मुरूम उपयोगात आणून जी आर कंम्पनीने मोट्या प्रमाणात नाला खोलीकरण केले या आधी पुराच्या पाण्याचा प्रवाह पसरत जात असल्याने पुलाला धोका होत नव्हता मात्र दोन वर्षा पासून नाला खोलीकरणाने प्रवाह अरुंद झाल्याने पुलाच्या दोन्ही पुलात भरण भरलेल वाहून केले असून पूल आतून पोळलं झाले आहे दोन्ही बाजूचे गडर वाहून गेले आहे त्यामुळे मोठा धोका निर्माण झाला आहे पावसाळ्यात पुलावरून मोट्या प्रमाणात पुराचे पाणी आल्याने मार्ग बंद होता त्यामुळे गुड्यावरील लोकांना शेतकऱ्यांना शेतात जाण्यासाठी तसेच मशान भूमीत अंत्यविधी करण्यासाठी मोठी अडचण निर्माण झाली आहे पूल दोन्ही बाजूनी पोकळ झाल्याने जीवित हानी होण्याची घटना नाकारता येत नाही तरी सदर पुलाचे नवीन बांधकाम जिल्हा परिषद बांधकाम विभाग चंद्रपूर यांच्या कडे माजी सरपंच विजय रणदिवे यांच्या सह ज्योतीराम मंगाम दशरत नैताम दिलीप मडावी भीमराव आत्राम कवडू मडावी हर्षल किनाके प्रफुल मडावी फकरू आत्राम ग्रामस्थांनी मागणी केली आहे

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here