कोरपणा हददीत गोवंशाची अमानुष व अवैध वाहतुक करणाऱ्यांविरुध्द कारवाई
एकुण १४ नग (गौवंशीय) जनावरांची सुटका, ६ लाख ८० हजार रु. चा माल जप्त
पोलीस स्टेशन कोरपना ची कामगिरी
दिनांक ७ फेब्रुवारी, २०२६ रोजी कोरपना पोलीसांनी मिळालेल्या गोपनिय माहितीवरून पोस्टे हद्दीत वनसडी टोलनाका येथे नाकाबंदी करुन प्राप्त खबरेनुसार एक पिकअप वाहन गडचांदुर मार्गे बेला आदीलाबाद कडे जाणारे वाहनास थांबण्याचा इशारा केला असता तो भरधाव वेगाने समोर निघुन गेल्याने त्याचा पाठलाग केला असता आरोपीतांनी वाहन माथा फाटा रोडवर उभी करून पळुन गेले. सदर वाहनाची पाहणी केली असता त्यात एकुण १४ नग गोवंशीय जनावरे निर्दयतेने दोरीने बांधुन कत्तलीसाठी नेत असल्याचे मिळुन आल्याने पिकअप वाहन क्रमांक टीएस०७-युके-३८८१ चा चालक व इतर विरुध्द पोलीस स्टेशन कोरपना येथे अपराध क्रमांक ९१/२०२६ कलम ५५ (ए), ६,९ महाराष्ट्र पशु संरक्षण अधिनियम व सहकलम ११(१) (ड) प्राण्यांचा छळ प्रतिबंध अधिनियम सहकलम १८४ मोटार वाहन कायदान्वये गुन्हा नोंदविण्यात आला असुन सदर वाहनातील एकुण १४ नग गोवंशीय जनावरे किं. अं. २८०,०००/- रु. ची आणि पिकअप वाहन किं. अं.४,००,०००/- रु. असा एकुण ६,८०,०००/-रुपयाचा माल जप्त करुन गोवंशीय जनावरांची सुटका करण्यात आली आहे.
पुढील तपास कोरपना पोलीस करीत आहे.
सदरची कामगिरी श्री मुम्मका सुदर्शन-पोलीस अधीक्षक चंद्रपूर, श्री ईश्वर कातकडे- अपर पोलीस अधीक्षक चंद्रपूर आणि श्री रविंद्र जाधव, उपविभागीय पोलीस अधिकारी गडचांदुर यांचे मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक लता वाडीवे यांचे नेतृत्वात पोहवा /९६९ राकेश वाकुलकर, नापोशि/२२१९ रामदास आडे, पोअं/९६४ लखन राठोड यानी केली आहे.