रेती तश्करी करणाऱ्यावर चंद्रपुर गुन्हेशाखा पोलीसची मोठी कारवाई

36

रेती तश्क्करी करणाऱ्यावर चंद्रपुर गुन्हेशाखा पोलीसची
मोठी कारवाई

सहा आरोपीसह 1कोटी 83 लाखाचा
मुद्देमाल जप्त

गडचांदूर :   चंद्रपुर जिल्हातील गडचांदूर जीवती लाटी आंबेझरी पाटण शेणगाव येथील रेती तस्कराचे धाबे दणाणले चंद्रपूर .कोरपणा तालुक्यातील वाळूचे अवैध वाहतूक होत असल्याने नांदा फाटा बस स्थानक समोर गुप्त माहिती चंद्रपूर स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक महेश कोंडावार यांना गुप्त माहीती मिळाली या माहितीच्या आधारे त्यांनी सापळा रचून पोलिसाच्या पथकाने घटनास्थळी छापा मारून 6 आरोपींना अटक केली. आरोपीकडून 4 हायवा ट्रक असा एकूण 1कोटी 83 लाख 20 हजाराचा मुद्देमाल जप्त केला आहे. ही कारवाई शुक्रवारी 1 मार्च रोजी सकाळी नऊ वाजताच्या सुमारास करण्यात आली
रेती घाटाचा लिलाव झाला नसल्याने खुल्या रेती तस्करी सुरू आहे. मागील काही दिवसापासून तालुक्यात येते तस्कराच्या घटना मध्ये वाढ झाली आहे. त्यामुळे वाळू तस्करी मध्ये गुन्हेगारी घटना वाढल्या आहे. रेती तस्करीत खून धमकावणे मारहाण आधी गुन्ह्याचे प्रमाण वाढत आहे. दरम्यान स्थानिक गुन्हे शाखेचे पीआय महेश कोंडावार यांना कोरपणा तालुक्यातील नारंडा बस स्थानकासमोर हायवा ट्रक मधून रेती तस्करी होत असल्याची गुप्त माहिती मिळाली. जिल्हा पोलीस अधीक्षकाच्या सूचनेवरून त्यांनी एक पथक तयार करून घटनास्थळ गाठले. कारवाईसाठी सापडा रचला हायवा ट्रक पाहून कारवाई करण्यात आली. कारवाईत संजय निवृत्ती देवकते वय 50 वर्ष राहणार जिवती, अंबादास राजू आत्राम वय 30 राहणार आंबेझरी ,सुरज प्रभाकर कुमरे वय 28 वर्षे राहणार लाठी, अशोक धर्मराज राठोड वय 26 वर्ष राहणार पाटण ,सद्दाम वजीर शेख राहणार सेनगाव ,आणि सचिन भोयर राहणार गडचांदूर आदींना अटक केली आहे.

चार ट्रक जप्त पोलिसांनी आरोपीकडून ट्रक क्रमांक
MH 34 BG 92 20, MH 34 B Z 0221 MH 34 BZ 5773 MH 34 BZ 9310 असे एकूण 1 कोटी 83 लाख 20 हजार किमतीचा रेतीसाठा करण्यात आला.
पोलिसांनी 6 आरोपींना कोरपणा पोलिसांच्या ताब्यात दिले आहे. ही कारवाई जिल्हा पोलीस अधीक्षक मुमक्का सुदर्शन, अप्पर पोलीस अधीक्षक रीना जनबंधू एल.सी.बी पोलीस निरीक्षक महेश कोंडावार यांच्या मार्गदर्शनाखाली पथकातील पोलीसनी कारवाई केली.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here