ना. सुधीरभाऊ मुनगंटीवार आरोग्य सेवा समिती तर्फे
रुग्णांची ४३ वी तुकडी शस्त्रक्रियेसाठी रवाना
घुग्घुस : शहरातील ना. सुधीरभाऊ मुनगंटीवार आरोग्य सेवा समिती महाराष्ट्रतर्फे रुग्णांची ४3 वी तुकडी विविध आजरांवर शस्त्रक्रियेसाठी मंगळवार, ५ मार्च रोजी सकाळी ना. सुधीरभाऊ मुनगंटीवार सेवा केंद्रातून सेवाग्रामला भाजपाचे माजी जिल्हाध्यक्ष देवराव भोंगळे यांच्या मार्गदर्शनात व भाजपाचे जिल्हा महामंत्री विवेक बोढे यांच्या नेतृत्वात रवाना करण्यात आली.
याप्रसंगी प्रयास सखी मंच घुग्घुसच्या अध्यक्षा किरण बोढे म्हणाल्या, ना. सुधीरभाऊ मुनगंटीवार आरोग्यसेवा समितीच्या माध्यमातून घुग्घुस व परिसरातील रुग्णांना विविध आजारांवर शस्त्रक्रियेसाठी सेवाग्रामला पाठविण्यात येत आहे.
विविध प्रकारचे आजार ज्या रुग्णांना झाले आहे, त्या सर्वांची शस्त्रक्रिया मोफत ना. सुधीरभाऊ मुनगंटीवार आरोग्यसेवा समिती महाराष्ट्र ही करत आहे. आज ६४ रुग्णांना पाठविण्यात आले असून, मागील अनेक वर्षांपासून ना. सुधीरभाऊ मुनगंटीवार आरोग्यसेवा समितीच्या माध्यमातून रुग्ण सेवेचे कार्य निरंतर सुरु आहे. रुग्णांनी शस्त्रक्रियेसाठी ना. सुधीरभाऊ मुनगंटीवार सेवा केंद्राशी संपर्क साधावा असे आवाहन केले.
यावेळी प्रयास सखी मंच घुग्घुसच्या अध्यक्षा किरण बोढे, माजी सरपंच संतोष नुने, अजय लेंडे, सुनंदा लिहीतकर, सचिन पाझारे, संदीप तेलंग, राकेश फुलझले, विजय बावणे आदी उपस्थित होते.