*पत्रकारांनी लिखाणाबरोबरच पत्रकार संघटनाकडे लक्ष द्यावे –संस्थापक अध्यक्ष विश्वास मोहिते
*भारतीय ग्रामीण वार्ताहर विकास परिषदेच्या पदाधिकारी निवडी जाहीर*
चंद्रपुर
पत्रकारांनी आपल्या लेखणीच्या माध्यमातून सर्वसामान्य लोकांच्या व्यथा,समस्या शासनापर्यंत पोहोचवण्याचे काम केलेच पाहिजे, पण आजच्या काळात पत्रकारांवर होत असलेले हल्ले पाहता त्याला विरोध करण्यासाठी आणि त्याचा संघर्ष करण्यासाठी पत्रकारांनी लेखणीबरोबरच पत्रकारांचे संघटनाकडे लक्ष द्यावे असे आवाहन भारतीय ग्रामीण वार्ताहर विकास परिषदेचे संस्थापक अध्यक्ष विश्वास मोहिते यांनी केले.
भारतीय ग्रामीण वार्ता विकास परिषदेच्या काही पदाधिकारी निवडी कराड येथील बैठकीत करण्यात आल्या. बैठकीच्या अध्यक्षस्थानी उपाध्यक्ष ज्येष्ठ पत्रकार दिलीप महाजन होते. यावेळी भारतीय ग्रामीण वार्ताहर विकास परिषदेच्या पदाधिकारी निवडी संस्थापक अध्यक्ष विश्वास मोहिते यांच्या आदेशाने आणि उपाध्यक्ष दिलीप महाजन यांच्या उपस्थितीत करण्यात आल्या.
यावेळी महाराष्ट्र राज्य उपाध्यक्ष दैनिक क्रांतिकारी जयभीम चे कार्यकारी संपादक संपतराव मोहिते यांची निवड करण्यात आली.
विश्वास मोहिते पुढे म्हणाले, आजच्या पत्रकारांवरील अन्यायाविरुद्ध निर्भीड असा लढा देण्यासाठी संघटन करणे काळाची गरज आहे. हे लक्षात घेऊन महाराष्ट्राबरोबरच राजस्थान, उत्तर प्रदेश, कर्नाटक बिहार, राजस्थान या राज्यातील पत्रकारांना एकत्रित घेऊन भारतीय ग्रामीण वार्ताहर विकास परिषद या संघटनेची स्थापना करण्यात आली आहे. संघटनेच्या माध्यमातून पत्रकारांवर अन्याय करणाऱ्या लोकांवर अंकुश ठेवण्याचे काम केले जाईल. शिवाय पत्रकारांच्या असणाऱ्या समस्या राज्य आणि केंद्र शासनापर्यंत पोहोचण्याचे काम संघटनेच्या माध्यमातून प्राधान्य न करण्याचा मानस असल्याचेही विश्वास मोहिते यांनी सांगितले.
यावेळी उपाध्यक्ष दिलीप महाजन म्हणाले, पत्रकार हा लोकशाहीतील महत्त्वाचा घटक आहे. परंतु पत्रकारांचीच मुस्कटदाबी काही दबाव तंत्र यंत्रणेकडून होताना दिसतो आहे. ही खेदजनक आणि भविष्यातील लोकशाही राज्य व्यवस्थेमध्ये धोक्याची घंटा दिसत आहे. संघटनेमध्ये सर्वांनी सामील होऊन अन्यायाविरुद्ध चा लढा संघटनात्मक दिला पाहिजे असेही दिलीप महाजन म्हणाले. स्वागत प्रास्ताविक अरुण जाधव यांनी केले. तर आभार चंद्रकांत जाधव यांनी मांडले.