
कोरपनामध्ये राजकीय भूकंप भाजपला रामराम ठोकत तुराणकर पिता पुत्राची शेतकरी संघटनेत घरवापसी
भाजप सोडत ऍड वामनराव चटपांच्या नेतृत्वावर पुन्हा विश्वास शेतकरी संघटनेच्या कार्यक्त्यामध्ये उत्साहाचे वातावरण
नितेश केराम
कोरपना तालुक्यातून एक मोठी राजकीय घडामोड समोर आली असून काही दिवसांपूर्वी शेतकरी संघटना सोडत भारतीय जनता पक्षात ( भाजप ) गेलेले सुभाष तुराणकर आणि ईश्वर सुभाष तुराणकर यांनी आज ( मंगळवार 3 नोव्हेंबर 2026 ) शेतकरी संघटनेत दिग्गजांच्या उपस्थितीत घरवापसी केली आहे शेतकरी संघटनेचे नेते तथा माजी आमदार ऍड वामनराव चटप यांच्या खणखणीत नेतृत्वावर पुन्हा एकदा पूर्ण विश्वास दाखवत त्यांनी भाजपशी सर्व संबंध संपवून आपली जुनी घरवापसी अधिकृत केली आहे
कोरपना येते आयोजित करण्यात आलेल्या एका अत्यन्त महत्वाच्या आणि दिमाखदार पक्षप्रवेश सोहळ्यात हा घरवापसी सोहळा पार पडला यावेळी शेतकरी संघटनेचे जिल्हाध्यक्ष अरुण पाटील नवले तालुकाध्यक्ष ऍड श्रीनिवास मुसळे संघटनेचे जेष्ठ नेते ड्रा मुसळे अनंताभाऊ गोडे अविनाश मुसळे नादीर कदरी शारिक अली संदीप टोंगे गणेश तुराणकर गनपत गोडे प्रवीण रासपल्ले सौरभ राऊत यांच्यासह शेकडो कार्यकर्ते मोट्या संखेने उपस्थित होते










