घुग्घुस नपतर्फे शहरात डेंग्यू प्रतिबंधक औषधीची फवारणी करणे सुरु
विवेक बोढे यांच्या मागणीला यश
घुग्घुस शहरात डेंग्यू प्रतिबंधक औषधीची फवारणी करा अशी मागणी भाजपा जिल्हा महामंत्री विवेक बोढे यांनी निवेदनातून केली होती.
भाजपा जिल्हा महामंत्री विवेक बोढे यांच्या निवेदनाची दखल घेत घुग्घुस नगर परिषदेतर्फे शहरात डेंग्यू प्रतिबंधक औषधीची फवारणी करणे सुरु करण्यात आले आहे
घुग्घुस शहरात डेंग्यू सदृश्य रुग्णांची संख्या वाढली आहे. शहरात काही दिवसापूर्वी डेंग्यू सदृश्य तापाने एका तरुणीचा मृत्यू झाला होता दिवसेंदिवस तापाच्या रुग्णांची संख्या वाढत असल्याने रुग्णालयात रुग्णांची मोठी गर्दी होत आहे.
डासांमुळे उद्भवणाऱ्या डेंग्यू सदृश्य रोगाची लागण शहरवासियांना मोठया प्रमाणात होत आहे. त्या अनुषंगाने शहरात डेंग्यू रोग प्रतिबंधक औषधाची फवारणी करणे अत्यंत आवश्यक होते.
भाजपा जिल्हा महामंत्री विवेक बोढे यांनी शिष्टमंडळासह नगर परिषदेचे मुख्याधिकारी निलेश रांजनकर यांची भेट घेतली व चर्चा करून घुग्घुस शहरात डेंग्यू प्रतिबंधक औषधीची फवारणी करण्यासाठी निवेदन दिले होते.