स्थानिक महिलांना नोकरीत घ्या लॉयड्स मेटल्स कंपनीत महिलांचा आंदोलन
जिल्ह्यातील प्रत्येक उद्योगात 35% महिलांना रोजगाराची मागणी
घुग्घूस : देशाच्या निवडणुकीत महिलांना पुरुषांच्या बरोबरीचा दर्जा आहे महिला व पुरुषांच्या मताला एक नागरिक म्हणून समान महत्व आहे मात्र रोजगारात प्रचंड भेदभाव आहेत जिल्ह्यातील उद्योगात महिलांना रोजगारच देण्यात येत नाही या असमानते विरोधात तसेच लॉयड्स मेटल्स कंपनी सह जिल्ह्यातील प्रत्येक उद्योगात महिलांना 35% रोजगार देण्याच्या मागणीला घेऊन महिला क्रांती संघटना घुग्घूसच्या वतीने 26 सप्टेंबर रोजी दुपारी 02 वाजता लॉयड्स कंपनीच्या प्रवेश द्वारावर यास्मिन सैय्यद सरस्वती पाटील यांच्या नेतृत्वाखाली दोन तास ठिय्या देत महिला हक्क आंदोलन करण्यात आले सदर आंदोलनाला सामाजिक कार्यकर्ते आशिष माशीरकर यांच्या वतीने जाहीर समर्थन देण्यात आले माशीरकर स्वतः आंदोलनात सहभागी झाले या आंदोलनाला शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे संघटना, राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्ष, अष्टविनायक बहुउद्देशीय संस्था, बहुजन समाज पार्टी,
चंद्रपूर जिल्ह्यात महिलांना रोजगार उपलब्ध नाहीत दहा ते बारा तास काम केल्यानंतर त्यांना केवळ तीन हजार ते पाच हजार रुपयेच पगार मिळतो विधवा परित्यकता व कुटुंबाची जवाबदारी असलेल्या अनेक सुशिक्षित व होतकरू मुली व महिला आहेत ज्यांना रोजगाराची आवश्यकता आहेत
घुग्घूस शहरात गेल्या तीस वर्षांपासून अस्तित्वात असलेल्या लॉयड्स मेटल्स कंपनीच्या प्रदूषणाने शहरातील महिलांना अनेक जीवघेणे आजार झालेले आहेत आता कंपनीचा नवीन विस्तारित प्रकल्प येत असल्याने त्यामध्ये महिलांना रोजगार द्या महिलाची प्रमुख मागणी आहे.
महिलांची भागीदारी ही पुरुषांच्या बरोबरीची असतांना महिलांनी केवळ शहरातील दुकानात अथवा हॉटेल मध्येच तीन चार हजार रुपयासाठी भांडेच धुवायचे काय? या प्रदूषणकारी उद्योगाची धूळ व प्रदूषण बरोबरीने सोसणाऱ्या महिलांना कंपनीने शहरात मोफत स्वयंरोजगाराचे शिकवणी केंद्र व व्यवसाय उपलब्ध करून द्यावे गरीब गरजवंत विद्यार्थ्यांना मुला मुलींना मोफत शालेय साहित्य, लॅपटॉप व सायकील वितरण करण्यात यावे तसेच लता नलभोगा या महिलेचा कंपनी गेट समोरील दुकान अतिक्रमनात हटविण्यात आले या महिलेला दहा लाख रुपयांचा मोबदला देण्यात यावे अश्या अनेक मागण्यायांना घेऊन आंदोलन करण्यात आले याप्रसंगी सामाजिक कार्यकर्ते इमरान खान,दिलीप पिट्टलवार,मयूर कलवल, शिल्पा गोहील,