प्रत्येक व्यक्तीने आपआपल्या वाढदिवस साजरा करण्याची संकल्पना वेगवेगळी असतात
राजुरा :
तालुक्यातील अमन करमनकर यांनी आपल्या वाढदिवसानिमित्त भोजनदान वाटप केलं व परिसरामध्ये वृक्षारोपण करून आपला वाढदिवस मोठ्या आनंदाने उत्साहाने साजरा केला .
आपल्या वाढदिवसाच्या दिवशी कुठलाही बडेजाव न करता समाजातील बरेचसे लोक काही आगळेवेगळे उपक्रम राबवत असतात यामध्ये कुणी अन्नदान करतो तर कुणी गोरगरिबांना फळांचे वाटप करतात कुणी वेगवेगळ्या स्पर्धांचे आयोजन करून बक्षीस वितरण करतात तर कोणी वंचित दुर्बल घटकांना मदतीचा हात देऊन सामाजिक बांधिलकी जोपासतात .आपल्या वाढदिवसाच्या दिवशी सामाजिक उपक्रम राबवितात गरजुंना मदतीचा हात मिळावा हा उद्देश यामागे असतो .हाच उद्देश मनाशी धरून अमन करमनकर यांनी मातोश्री वृद्धाश्रम विसापूर, चंद्रपूर येथे भोजनदान वाटप करून आपला वाढदिवस साजरा करण्याचा मानस केला. निसर्गाचा समतोल राखण्यासाठी झाडे लावणं फार महत्त्व गरजेचा आहे कारण पर्यावरणाचा समतोल बिघडला तर खूप कठीण परिस्थिती भविष्यात निर्माण होण्याची शक्यता नाकारता येत नाही त्यामुळे प्रत्येकाने आपल्या वाढदिवसाच्या दिवशी निदान एक तरी झाड लावून त्यांचे संगोपन केलं पाहिजे .अमन करमनकर यांनी वाढदिवसाच्या दिवशी वृक्षारोपणही केलं अशाप्रकारे भोजनदान व वृक्षारोपण करून अमन करमनकर या युवकाने आपला वाढदिवस साजरा केला.त्यांचे विविध क्षेत्रांतील मान्यवरांकडून अभिनंदन करण्यात आले सहकार्य – भारती ताई पाल,अंकुश पारेकर, चैतन्य करमनकर, अमोल दुर्गे, दिक्षा नगराळे, महिमा नगराळे,रविना दुर्गे, अनिकेत मेश्राम, संकेत खोब्रागडे,प्रणय नगराळे,प्रतीक दुर्गे, प्रतिक नगराळे, प्रणय लोखंडे,
मा संपादक साहेब हि बातमी आपल्या न्यूज पेपर मध्ये प्रकाशित करावी ही विनंती