चिमूर येथे श्रीहरि बालाजी महाराजाची घोडरथ याञा असल्यांने वाहतुक व्यवस्थेमध्ये बदल

38

चिमूर येथे श्रीहरि बालाजी महाराजाची घोडरथ याञा असल्यांने वाहतुक व्यवस्थेमध्ये बदल



चिमुर, :
दिनांक १० फेब्रुवारी २०२५ रोजी मौजा चिमुर जि. चंद्रपुर येथे दरवर्षी प्रमाणे श्रीहरी बालाजी महाराज घोडारथ यात्रा असल्याने सदर यात्रेकरीता मोठ्या प्रमाणात भावीकांची गर्दी होण्याची शक्यता आहे. त्याकरीता महाराष्ट्र पोलीस अधिनियम-१९५१ च्या कलम ३३(१) (ब) नुसार सार्वजनिक ठिकाणी सुरळीत रहदारी व सुव्यवस्था राखण्यासाठी करावयाच्या उपाययोजना व नियमणासाठी प्राप्त असलेल्या कायदेशीर अधिकारान्वये आम्ही मुम्मका सुदर्शन, पोलीस अधीक्षक, चंद्रपुर सदर मार्गावर वाहतुक सुरळीत चालावी, वाहतुकीस कुठल्याही प्रकारचा अडथळा निर्माण होऊ नये व जनतेला त्रास अगर गैरसोय होऊ नये म्हणुन वाहतुक
व्यवस्थेमध्ये पुढीलप्रमाणे बदल करणेबाबत अधिसुचना निर्गमीत करण्यात येत आहे.
दिनांक 10/02/2025 रोझी संध्याकाळी 17:00 वा. दिनांक 11/02/2025 सकाळी 10:00 वा.
पर्यंत खालीलप्रकारे वाहतुक व्यवस्थेमध्ये बदल करण्यात येत आहे.
१) हजारे पेट्रोलपंप विमुर ते सरकारी दवाखाना चिमुर पर्यंत सर्व प्रकारची वाहतुक बंद राहील.
२) आवश्यकतेनुसार सदर कालावधीत या अधिसुचनेमध्ये बदल करण्यात येईल.
या कालावधीत सर्व प्रकारची वाहतुक दारांनी पुढील पर्यायी मार्गाचा वापर करावा.
१. भिसी ते विमुर-वरोरा-चंद्रपुर जाण्यासाठी कन्हाळगांव-महालगांव-तिरपुरा-गदगांव या रोडचा अवलंब करावा.
२. जांभुळघाट ते विमुर किंवा वरोरा-चंद्रपुर जाण्यासाठी भिसी- कन्हाळगांव-महालगांव-तिरपुर-गदगांव या रोडचा अवलंब करावा.
३. नेरी वरून चिमुर किंवा वरोरा-चंद्रपुर-भिसी ला जाण्यासाठी जाण्यासाठी जांभुळघाट भिसी-कन्हाळगांव-महालगांव-तिरपुरा-गदगांव या रोडचा अवलंब करावा.
४. वरोरा कडुन भिसी-जांभुळघाटला जाण्यासाठी गदगाव-तिरपुरा-महालगांव-कन्हाळगांव या रोडचा अवलंब करावा.
वरिल निर्देशाचे पालन करून सर्व प्रकारचे वाहतुकदारांनी प्रशासनाला सहकार्य करावे असे आवाहन करण्यात येत आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here