बेकायदेशीर जमाव जमवुन शासन व ग्रेटा कंपनी विरुध्द आंदोलन करणाऱ्यांविरुध्द दोन गुन्हयाची नोंद…

34

 

बेकायदेशीर जमाव जमवुन शासन व ग्रेटा कंपनी विरुध्द आंदोलन करणाऱ्यांविरुध्द दोन गुन्हयाची नोंद…



चंद्रपुर:
पोलीस स्टेशन भद्रावती अंतर्गत ग्रेटा कंपनी विरुध्द विविध मागण्याकरीता आमदार सुधाकर अडबाले यांचे नेतृत्वात आंदोलन सुरु असुन दिनांक १९/०२/२०२५ रोजी माहिती मिळाली की, आवारी सिमेंट प्लॉट तेलवासा रोड भद्रावती येथे आमदार सुधाकर अडबाले यांचे अध्यक्षतेखाली निप्पॉन डेन्ड्रो विषयी दिशा ठरविण्याचे दृष्टीकोणातून व आंदोलन करण्याचे दृष्टीकोणातुन बैठक आयोजित करण्यात आले असुन सदर बैठकीत वासुदेव ठाकरे, प्रविण सातपुते, अनुप खुटेमाटे, मधुकर सावनकर व इतर १५ ते २० इसम हजर होते. सदर बैठकी दरम्यान नमुद सर्वानी प्रशोभक भडकावु भाषणे करुन जमलेल्या लोकांचे मनात रोष निर्माण करुन बेकायदेशीर जमाव जमवुन शासन व ग्रेटा एनर्जी कंपनी विरुध्द घोषणाबाजी करुन सार्वजनिक शांतता भंग करुन कंपनीतर्फे लावण्यात आलेले बोर्डची तोडफोड करुन नुकसान केले व शासनाविरुध्द निषेधात्मक घोषणाबाजी करुन निषेध दर्शविणारे फलक दाखवुन कलम ३७ (१) (३) महाराष्ट्र पोलीस कायद्याचे उल्लघंन केल्याने त्यांच्या विरुध्द कलम १८९ (२), १२४ (४) भारतीय न्याय संहिता सहकलम १३५ महाराष्ट्र पोलीस कायद्यान्वये पोलीस स्टेशन भद्रावती येथे अपराध क्रमांक ४४/२०२५ अन्वये गुन्हा नोंदविण्यात आला आहे.
तसेच नमुद आंदोलनकर्त्यांनी कंपनीचे लैंड डेव्हलमेंट चे काम पाहणारे यांची कार रस्त्यात अडवुन त्यांना अश्लिल शिवीगाळ करुन कारचे कॉच फोडुन व हाताबुक्क्रयांनी मारहाण करुन कंपनीचे काम सुरु केलयास आमचा हिसका दाखवितो म्हणुन धमकी दिल्याचे तक्रारीवरुन आमदार यांचेसह नमुद इसमांविरुध्द कलम ११५ (२), १८९ (२), १९०, १९१ (२), २९६, ३५१ (२), ४९, १२७ (२), ३२४ (४) भारतीय न्याय संहिता अन्वये पोलीस स्टेशन भद्रावती येथे अपराध क्रमांक ४५/२०२५ अन्वये गुन्हा नोंदविण्यात आला असुन गुन्हयात आरोपी नामे वासुदेव मोहन ठाकरे व प्रविण नथ्थुजी सातपुते यांना अटक करण्यात आली असुन गुन्हयाचा पुढील तपास भद्रावती पोलीस करीत आहे.
याद्वारे सर्व नागरीकांना आवाहन करण्यात येते की, त्यांनी त्यांच्या रास्त मागण्याकरीता कायदेशीर मार्गाचा अवलंब करून चंद्रपूर जिल्हयातील शांतता व सुव्यवस्था आबाधीत राखावी.
तसेच जिल्हयातील सर्व उद्योग धंदे व व्यवसायीक यांना सुध्दा आवाहन करण्यात येत आहे की, कोणीही कायदेशीर कामकाजात त्यांना बेकायदेशीर अडथळा निर्माण करत असेल, खंडणी मागत असल्यास तात्काळ पोलीस प्रशासनाला संपर्क साधुन तक्रार दयावी, संबंधीतांविरुध्द तात्काळ योग्य ती कायदेशीर कारवाई करण्यात येईल.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here