अप्पर पोलीस महासंचालक वाहतुक मुंबई ,यांचे आदेश जारी
पोलीस अधीक्षक,वाहतुक नियंत्रण शाखा,चंद्रपूर यांनी अव्हान केले
90 दिवसापेक्षा जास्त थकीत दंड असलेल्यावाहनचालकांवर होणार कोर्टात खटला दाखल
चंद्रपुर : महाराष्ट्र राज्यात कसुरदार वाहन चालकावर वन स्टेट वन ई चलान प्रकल्पाअंतर्गत कसुरदार ई चालान धारक/मालक यांचेवर कारवाई करण्यात येत आहे. सदर कसुरदार ई चालान धारक/मालक यांनी मुदतीत दंड भरणा न केल्यास अशा कसुरदार वाहन चालक/मालकावर मा. न्यायालयात खटला दाखल करण्याबाबत अप्पर पोलीस महासंचालक (वाहतुक) मुंबई यांनी आदेश जारी केलेले आहेत.उच्च पोलीस एक राज्य एक चलन
चंद्रपुर जिल्हयातील कसुरदार वाहन चालक/मालक हे विहीत मुदतीत दंड न भरल्यामुळे मोठया प्रमाणात दंड हे प्रलंबित आहेत. तरी ज्या कसुरदार वाहन चालक/मालक यांचेवर ९० दिवसाचे वर दंड प्रलंबित आहे त्यांनी तात्काळ आपल्या जवळच्या पोलीस ठाणे किंवा वाहतुक नियत्रंण शाखा चंद्रपुर येथे जावुन दंड भरणा करावे किवा महाट्रॉफिक या अॅपवर ऑनलाईन दंड भरावे. जे वाहन चालक/मालक हे विहीत मुदतीत आपले कडे प्रलंबित असलेला दंड भरणा करणार नाही अशा वाहन चालक /मालकांविरूध्द मा. न्यायालयात खटला दाखल करण्यात येणार आहे. जर कोर्टात खटला दाखल झाला तर वाहन चालक कोर्ट व्यतीरिक्त इतर दुस-या कोणत्याही माध्यमाव्दारे चालानाचा दंड भरणा करू शकणार नाहीत.