भाकप यवतमाळ तालुक्याचे त्रैवार्षिक अधिवेशन उत्साहात संपन्न काॅ.ईश्वर दरवरे यांची तालुका सचिवपदी फेरनिवड

37

 

भाकप यवतमाळ तालुक्याचे त्रैवार्षिक अधिवेशन उत्साहात संपन्न काॅ.ईश्वर दरवरे यांची तालुका सचिवपदी फेरनिवड

यवतमाळ :- स्थानिक श्रमशक्ती भवन यवतमाळ येथे कॉ.गुलाबराव उमरतकर(राज्य कौंसिलर,किसान‌ सभा) यांचे अध्यक्षतेखाली भारतीय कम्युनिस्ट पक्षाचे त्रैवार्षिक तालुका अधिवेशन उत्साहात संपन्न झाले.अधिवेशनाचे उद्घाटन कॉ. विजय ठाकरे (जिल्हाध्यक्ष ,आयटक) यांनी केले तर प्रमुख मार्गदर्शक म्हणुन कॉ.सुनिल गेडाम(राज्य कौन्सिलर, भाकप),काॅ.हिम्मतराव पाटमासे,काॅ.दिवाकर नागपुरे(सचिव मंडळ सदस्य,भाकप),कॉ.दिलीप महाजन(तालुका सचिव भाकप , नेर) हे उपस्थित होते.याप्रसंगी अनेक विषयांवर चर्चा करण्यात आली.पक्षाचे सभासद वाढविणे, पक्षाच्या तालुका जनआघाड्यां कार्यान्वित करणे,शाखा बांधणी करणे,तालुक्यातील समस्या घेऊन आंदोलन उभारण्यावर लक्ष केंद्रित करण्याचे ठरले.नविन कौंसि लने पुढील तीन वर्षांकरीता कृती कार्यक्रम अधिवेशनात मांडला व तो सर्वांनी एकमताने मंजुर केला.शेवटी 21 सदस्यीय तालुका कौंसिलची निवड करण्यात आली त्यामध्ये कॉ.ईश्वर दरवरे यांची तालुका सचिवपदी फेरनिवड करण्यात आली तर सहसचिवपदी १)कॉ.ॲड.अरूण जवके २) कॉ.ज्योती रत्नपारखी ,तर कोषाध्यक्ष कॉ.विजया वडतकर व तालका कौंसिल सदस्य म्हणुन कॉ.हीम्मत‌ पाटमासे, कॉ.संजय भालेराव,कॉ.दिवाकर नागपुरे,कॉ.गया सावळकर,कॉ.विजय ठाकरे,कॉ.ममता पाटील, कॉ.किशोर सालपे,सविता कट्यारमल,सुशील घोटेकार,हरीहर‌ जोशी यांचा समावेश आहे.अधिवेशनाचे संचालन काॅ.संजय भालेराव यांनी तर आभार‌ प्रदर्शन‌ तालुका सचिव काॅ.ईश्वर दरवरे यांनी‌ मानले.यावेळी पक्षाचे अनेक सभासद उपस्थित होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here