Home Breaking News वणी रुख्मिणी कोलवाशरीचा राजुर रेल्वे साइडिंगात मोठा भ्रष्टाचार  :  अरबाज खान

वणी रुख्मिणी कोलवाशरीचा राजुर रेल्वे साइडिंगात मोठा भ्रष्टाचार  :  अरबाज खान

161

वणी रुख्मिणी कोलवाशरीचा राजुर रेल्वे साइडिंगात मोठा भ्रष्टाचार  :  अरबाज खान



रुख्मिणी कोल वाशरीचा काळाबाजार चव्हाट्यावर


वणी येथून जवळच असलेल्या राजूर कॉ. येथील रुख्मिणी कोल वाशरीला महाजेनकोने ५० हजार टन कोल वाशचे काम दिले आहे.
परंतु रुख्मिणी कोल वाशरीत भोंगळ कारभार सुरु आहे. कोल वाश करून फक्त्त ते महाजेनकोला ४०% कोळसा व ६०% डस्ट हे मिश्रण करून रेल्वे डब्ब्याने महाजेनकोला पाठवत आहे.
इतर वाश केलेला कोळसा बाजारात उच्च भावात विकून महाजेनकोची फसवणूक करीत आहे. त्यांच्याकडून १००% पैसे वसुल करीत आहे.
या भ्रष्टाचारावर आळा घालण्याकरिता रुख्मिणी कोल वाशरीची तपासणी करून कारवाई करण्यात यावी अशी मागणी वणी काँग्रेस कमेटी अल्पसंख्यांक तालुकाध्यक्ष अरबाज अहेमद खान यांनी ठाणेदार वणी पोलीस स्टेशन यांना दिलेल्या निवेदनातून केली आहे. सात दिवसात कारवाई न केल्यास आमरण उपोषणाचा इशारा देण्यात आला आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here