लॉयड्स इन्फिनाईट फाऊंडेशनतर्फे जागतिक महिला दिन उत्साहात साजरा करण्यात आला.

42

लॉयड्स इन्फिनाईट फाऊंडेशनतर्फे जागतिक महिला दिन उत्साहात साजरा करण्यात आला.



घुग्घूस (चंद्रपूर), ८ मार्च: : लॉयड्स इन्फिनाईट फाऊंडेशन आणि लॉयड्स मेटल्स अँड एनर्जी लिमिटेड यांच्या संयुक्त विद्यमाने त्रिमूर्ती सेलिब्रेशन, घुग्घूस येथे जागतिक महिला दिन उत्साहात साजरा करण्यात आला. या मेळाव्यास १० गावांतील १००० हून अधिक महिलांनी सहभाग घेतला. महिलांच्या शिक्षण, सर्वांगीण विकास आणि समाज उन्नतीसाठी महिला शक्तीच्या दृढ संकल्पनेवर या कार्यक्रमात भर देण्यात आला.
कार्यक्रमाचे उद्घाटन श्री. पवन मेश्राम (वरिष्ठ उपाध्यक्ष, लॉयड्स मेटल्स अँड एनर्जी लिमिटेड) यांच्या हस्ते झाले. अध्यक्षस्थानी श्री. मुकेश भेलावे (वरिष्ठ उपाध्यक्ष, लॉयड्स मेटल्स अँड एनर्जी लिमिटेड) होते. प्रमुख मार्गदर्शक म्हणून श्रीमती शुभांगी पिजदुरकर (विस्तार शिक्षण अधिकारी, जिल्हा परिषद चंद्रपूर), सुश्री अरुंधती कावळकर (विद्यालय शिक्षण अखिल भारतीय प्रमुख, भारतीय विद्या मंडळ व प्राचार्य, सन्मित्र सैनिक विद्यालय, चंद्रपूर) आणि श्रीमती जे. सी. रॉय (प्राचार्य, जी. डी. गोयंका लॉयड्स पब्लिक स्कूल, म्हातारदेवी) यांनी महिलांना मार्गदर्शन केले. तसेच श्री. तरुण केशवाणी (वरिष्ठ व्यवस्थापक, लॉयड्स मेटल्स अँड एनर्जी लिमिटेड) व विविध गावांतील महिला सरपंच या कार्यक्रमाचे मान्यवर पाहुणे होते.
कार्यक्रमात घुग्घूस व परिसरातील महिलांचा सत्कार करण्यात आला. ग्रामीण भागात सामाजिक विकासात योगदान देणाऱ्या तसेच कुटुंबाच्या उन्नतीसाठी कार्यरत असलेल्या महिलांना स्मृतिचिन्ह देऊन सन्मानित करण्यात आले. महिलांच्या हक्क, कर्तव्य आणि सशक्तीकरणावर मान्यवरांनी आपल्या विचारांची मांडणी केली.
मार्गदर्शन करताना सुश्री अरुंधती कावळकर मॅडम यांनी महिलांसोबत पुरुषांचा सहभागही महत्त्वाचा असल्याचे सांगितले. “सशक्त कुटुंबामुळे सशक्त समाज घडतो, आणि महिलांचा सन्मान हा समाजाच्या प्रगतीसाठी अनिवार्य आहे,” असे त्यांनी प्रतिपादन केले. श्रीमती जे. सी. रॉय मॅडम यांनी “स्त्रीचे सौंदर्य तिच्या विचारांमध्ये असते, आणि चांगले विचार एक सुदृढ कुटुंब निर्माण करतात,” असे सांगितले. श्रीमती शुभांगी पिजदुरकर मॅडम यांनी मुलांचे संगोपन आणि शिक्षणात महिलांनी विशेष लक्ष घालावे, असे मार्गदर्शन केले.
श्री. पवन मेश्राम साहेब यांनी महिला दिनाच्या शुभेच्छा देत लॉयड्स मेटल्स अँड एनर्जी लिमिटेडमध्ये महिला सशक्तीकरणाला महत्त्व दिले जात असल्याचे नमूद केले. “स्टील मायनिंग क्षेत्रातही महिला आघाडीवर असून, लॉयड्स महिलांच्या सर्वांगीण विकासासाठी कटिबद्ध आहे,” असे त्यांनी सांगितले.
महिला दिनानिमित्त विविध स्पर्धांचे आयोजन करण्यात आले होते, ज्यामध्ये नृत्य स्पर्धा, वक्तृत्व स्पर्धा, फॅशन शो, पथनाट्य, आणि भाषण स्पर्धांचा समावेश होता. या स्पर्धांमध्ये विजयी महिलांना मान्यवरांच्या हस्ते बक्षिसे देण्यात आली.
कार्यक्रमास लॉयड्स इन्फिनाईट फाऊंडेशन व लॉयड्स मेटल्स अँड एनर्जी लिमिटेडचे अधिकारी, कर्मचारी तसेच स्थानिक महिला मोठ्या संख्येने उपस्थित होत्या.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here