रुक्मिणी वाशरी येथे काळा भ्रष्टाचाराचा विल्हेगाट लावण्यासाठी महाजैनको नागपुर कोराडीत निवेदन

41

रुक्मिणी वाशरी येथे काळा भ्रष्टाचाराचा विल्हेगाट लावण्यासाठी महाजैनको नागपुर कोराडीत निवेदन



अरबाज खान, तालुकाध्यक्ष, वणी काँग्रेस कमिटी अल्पसंख्याक ने दिले निवेदन


वणी ,
रुख्मिनी कोल वॉशरी राजुर कॉ. (RIPL) येथुन काळा भ्रष्टाचार होत असल्याबाबत.
अरबाज खान यानी नागपुर कोराडी कार्यलय येथे निवेदनाच्या माध्यमातुन सागीतली आहे की, राजुर येथील रुख्मिनी कोल वॉशरी ला महाराष्ट्र स्टेट पॉवर जनरेशन कंपनी लिमिटेड (MAHAGENCO) यांची ५० हजार टन कोल वॉश चे काम दिले आहे. परंतु रुख्मिनी कोल वॉशरी येथून भोंगळ कारभार चालू आहे. कोल वॉश करुन ते फक्त महाजनको या कंपनीला ४०% कोळसा व ६०% डस्ट हे मिश्रण करुन रेल्वे डब्यांनी महाराष्ट्र स्टेट पॉवर जनरेशन कंपनी लिमिटेड (MAHAGENCO) या कंपनीला पाठवित आहे. व इतर वॉश केलेला कोळसा ते मार्केट मध्ये उच्च भावात विरुन महाजनको या कंपनीची फसवणूक करुन त्यांच्या पासून १००% कोळशाचा पैसा वसुल करीत आहे.

या होणाऱ्या भोंगळ कारभारावर आळा घालण्याकरीता व रुख्मिनी कोल वॉशरी ची योग्य तपासणी करुन योग्य ती कारवाई करण्याकरीता अरबाज खान यानी निवेदन देऊन सांगीतले आहे,तरी जर आपण सात दिवसात कारवाई करण्यास असमर्थ ठराल तर आम्ही आमरण उपोषण करु व योग्य न्याय मिळवून घेऊ अशी आक्रोशित भुमीका अरबाज खान ने कंपनीच्या सामोर केली

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here