भारतीय बौद्ध महासभा शाखा घुग्घुस च्या अनुषंगाने भव्य रॅली काढून भीम जयंती उत्साहात साजरी
घुग्घुस : भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार प. पु. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती जगभरात मोठ्या थाटामाटात साजरी केली जाते. संपूर्ण भारत देशात ठिकठिकाणी त्यांच्या प्रतिकमेची मिरवणूक काडुन भीम जयंती उत्साहात साजरा केला जाते. त्याचप्रमाणे भारतीय बौद्ध महासभा शाखा घुग्घुस च्या अनुषंगाने घुग्घुस शहरामध्ये मोठा थाटामाटात भीम जयंती ची मिरवणूक काढण्यात येते.।
भारतीय बौद्ध महासभेचा वतीने सकाळी नगर परिषद घुग्घुस येथे डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून सामुहिक पंचशील त्रिशरण घेऊन बाबासाहेबांचा जयघोष करीत हि मिरवणूक पंचशील बौद्ध विहार घुग्घुस येथे प्रबोधनात्मक कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता।.
कार्यक्रमाचे अध्यक्ष सुरेश मल्हारी पाईकराव तर प्रमुख उपस्थिती, घुग्घुस पोलीस निरीक्षक, प्रकाश राऊत, निलेश रांजणकर मुख्याधिकारी नगर परिषद घुग्घुस, हे होते प्रमुख मार्गदर्शक म्हणून ऐश्वर्या पाईकराव, साक्षी जिवने केंद्रीय शिक्षिका मायाताई सांड्रावार विहार बांधकाम कोषाध्यक्ष, हेमंत आनंदराव पाझारे, कार्याध्यक्ष चंदगुप्त फकरू घागरगुंडे, कोषाध्यक्षा, वैशालीताई निखाडे, समता सैनिक दल अध्यक्षा अश्विनीताई सातपुते यशोधरा महिला मंडळ अध्यक्षा रिताताई देशकर उपाध्यक्षा प्रतिभाताई कांबळे आदी उपस्थित होते।
प्रमुख पाहुण्यांचा हस्ते भगवान बुद्ध, सम्राट अशोक, महात्मा ज्योतिबा फुले, बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून दिप प्रज्वलित करून धम्म ध्वज, निळा ध्वजारोहण करुन सामुहिक बुध्द वंदना भीम स्तुती घेऊन कार्यक्रमाला सुरुवात करण्यात आली.।
सुरेश मल्हारी पाईकराव, यांनी मनोगत व्यक्त करताना सांगितले की भीम जयंती हि आपण वेसन मुक्त करुन करावी असे मनोगत व्यक्त करताना शंकर सांड्रावार यांनी उद्या पासुन मी दारु पिणार नाही असे सर्वांचा उपस्थित सांगितले प्रकाश राऊत पोलीस निरीक्षक घुग्घुस ऐश्वर्या पाईकराव, साक्षी जिवने, हेमंत आनंदराव पाझारे, प्रतीभाताई कांबळे यांनी आपले मनोगत व्यक्त केले. पंचशील बौद्ध विहाराचे बांधकाम सुरू आहे या बांधकामाला लोक वर्गणी काढून विहार बांधण्त सों आले. आयुनी. सुनंदा एकनाथ सोंडुले यांनी विहार बांधकामाला दहा हजार रुपये दान दिले तर आयुनी. कुमुद विरेंद्र निखाडे यांनी विहार बांधकामाला दहा हजार रुपये दान दिले असे विहार बांधकामाला विस हजार रुपये दान आले.।
लहान मुली उन्नती भगत, प्रतीक्षा भगत, छकुली पेटकर यांनी सामुहिक नृत्य सादर करून चिमुकल्या लहान मुलीने अदिती विरेंद्र निखाडे हिने भीम गीत गाऊन तर माही पाझारे हिने मनोगत व्यक्त करुन मानवंदना दिली.।
सायंकाळी भारतीय बौद्ध महासभा शाखा घुग्घुस च्या अनुषंगाने भव्य मिरवणूकचे आयोजन करण्यात आले होते dj च्या गडगडाट हजारो संख्येच्या मिरवणूक काढण्यात आली घुग्घुस शहरातील विविध विहार महाप्रज्ञा बुध्द विहार, इंदिरा नगर, जैतवन महाबोधी बौद्ध विहार शास्त्री नगर, सारिपुत्त बौद्ध विहार गांधी नगर, गौतम सिद्धार्थ बौद्ध विहार केमिकल वार्ड, आम्रपाली बौद्ध विहार अमराई नवयुवक बौद्ध विहार दोन नंबर तक्षशिला जनजागृत महीला मंडळ बैयरम बाबा नगर, येथील मिरवणूक पंचशील बौद्ध विहार येथे एकत्रित येऊन मिरवणूक बाबासाहेबांच्या जयजयकार घोषणा देत गांधी चौक ते बॅक ऑफ इंडिया, समारोपीय कार्यक्रम जुनी तहसील कार्यालय येथे बाबासाहेबांच्या पुर्णाकृती पुतळा येथे सामुहिक बुध्द वंदना घेऊन मानवंदना घेऊन कार्यक्रमाची सांगता करण्यात आली नागेश पाईकराव यांनी स्वतः तयार केलेली भगवान गौतम बुध्द व बाबासाहेब आंबेडकर यांच्या जिवणावर आधारित रॅप तयार केलेले गाणे गाहुण मानवंदना दिली.।
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन रमाबाई सातारडे कोषाध्यक्ष यशोधरा महिला मंडळ तर आभार प्रदर्शन रिताताई देशकर अध्यक्षा यशोधरा महिला मंडळ यांनी केले. यावेळेस भारतीय बौद्ध महासभा नगर शाखा घुग्घुस उपाध्यक्ष शरद मल्हारी पाईकराव, योगेश नगराळे, सल्लागार संभाजी पाटील, जयंत निखाडे रवी देशकर, बबन वाघमारे, विजय कवाडे व सर्व घुग्घुस येथील बौद्ध बांधव उपस्थित होते