कोरपना तालुक्यातील पंचायत समिती समोर आज पासून महाराष्ट्र राज्य ग्राम पंचायत कामगार सेना यांचे काम बंद आंदोलन
नितेश केराम
कोरपना / आज दि 1/5/2025 रोजी कोरपना पंचायत समिती समोर महाराष्ट्र राज्य ग्राम पंचायत कामगार सेना यांनी आंदोलनास केली आहे ग्रामपंचायत कर्मचारी हा भर उन्हा तावत आपल्या हक्काच्या मागणी साठी सर्व ग्रामपंचायत कामकाज बंद ठेवून सर्व ग्रामपंचायत कर्मचारी हें आंदोलनात सहभागी झाले मागील 10 वर्षा पासून हें कर्मचारी आपल्या हक्काच्या मागण्या मान्य केल्या पाहिजे यासाठी शासन दरबारी जाऊ लागले.
परंतु सरकार या कर्मचाऱ्यांडे दुर्लक्ष करीत आज हा कर्मचारी फक्त मानधन वर आपला पूर्ण परिवार चालवत आहे परंतु आज पावतो येवडी महागाई वाढली आहे.
पण या ग्रामपंचायत कर्मचारी रात्र दिवस काम करून सुद्धा या कर्मचाऱ्याकडे या सरकारच दुर्लक्ष आहे.
आज या सरकारला जागा दाखवण्यासाठी महाराष्ट्रातील 27 हजार ग्रामपंचायती म्हणजे 60 हजार ग्रामपंचायत कर्मचारी यांनी आपल्या हक्काच्या मागण्या मंजूर करण्यासाठी या सरकार 1 व 2 मे या दोन दिवसाचा एल्टीमेट दिला आहे जर या दोन दिवसा मध्ये ग्रामपंचायत कर्मचारी यांच्या मागण्या पूर्ण न झाल्यास सर्व महाराष्ट्राती 27 ग्रामपंचायत कर्मचारी बेमुदत काम बंद आंदोलन करणार असा इशारा महाराष्ट्र राज्य ग्राम पंचायत कामगार सेना एन जी पी 5825 यांच्या कडून देण्यात आला.
या वेळी उपस्थित मान्यवर श्री विलासभाऊ कुमरवार राज्याध्यक्ष श्री मंगेश विलास चिंचोलकर महाराष्ट्र राज्य ग्रामपंचायत कर्मचारी कामगार सेना तालुका कोरपना एन जी पी 5825 श्री अजय सिडाम उपाध्यक्ष श्री विठ्ठल जुनघरे सचिव श्री गंगाराम जुमनाके कोषाध्यक्ष श्री स्वप्नील पाचभाई सहसचिव श्री नामदेव मुक्के सदस्य श्री श्रीधर मडावी सदस्य श्री गोवर्धन बोधे सदस्य श्री रवी पंधरे सदस्य श्री संदीप नैताम सदस्य श्री उत्तम मुठलकर सदस्य श्री राहुल कल्लूरवार व सर्व ग्रामपंचायत कर्मचारी कोरपना