घुग्घुस येथे छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व शिबिर अभियान संपन्न.

51

घुग्घुस येथे छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व शिबिर अभियान संपन्न.



घुग्घुस-: तहसील कार्यालय चंद्रपूर मार्फत राजस्व मंडळ घुग्घुस द्वारा आयोजित छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व शिबिर अभियान शुक्रवार दिनांक २ मे 2025 रोजी सकाळी ८ ते १२ वाजेपर्यंत ग्राम पंचायत परिसर पांढरकवडा येथे यशस्वीरित्या आयोजित करण्यात आले.
या कार्यक्रमाचे अध्यक्ष डॉक्टर सचिन खंडाळे नायब तहसीलदार चंद्रपूर तसेच प्रमुख अतिथी म्हणून सरपंच ग्रामपंचायत वढा किशोर वरारकर,माजी सरपंच ग्रामपंचात पांढरकवडा सुरज तोतडे ,उपसरपंच ग्राम पंचायत धानोरा विनोद खेवले ,निलेश पडगेलवार आरोग्य अधिकारी घुग्घुस,पोलीस पाटील पांढरकवडा सचिन टिपले व पोलिस पाटील उसगाव सर्वप्रथम मान्यवरांच्या हस्ते सर्व उपस्थित सरपंच यांचे शाल व श्री फळ देऊन सत्कार करण्यात आला .
तसेच शिषवृत्ती प्राप्त विद्यार्थी १)निलम भगत ,वढा
२)कार्तिक आऊतकर ,वढा ३)हर्षदा अजय गोबाडे , रा.शेणगांव
४)परी अविनाश मोडक ,रा.शेणगांव
५)नील चरणदास बोबडे ,रा.शेणगांव
६)पवन राजेंद्र मत्ते ,रा.शेणगाव ७)साहिल राजू जुनघरे ,रा.धनोरा ८)प्रेम मिथुन गेडाम, रा.धानोरा या सर्व मुलाना शिषवृत्ती मिळ्याबदल व
९) असित प्रविण धोटे ,रा.पांढरकवडा या मुलाचा केंद्रीय नवोदय विद्यालय येथे निवड झाल्याबद्दल सर्व विद्यार्थ्यांना भेट वस्तू देऊन व उपस्थित सर्व मान्यवरांचे पुष्पगुच्छ देऊन स्वागत करण्यात आले.
महसूल विभागामार्फत घेण्यात आलेल्या आजच्या या अभियानामध्ये कार्यक्रमाचे अध्यक्ष डॉक्टर सचिन खंडाळे नायब तहसीलदार चंद्रपूर यांनी या अभियानाचे महत्त्व समजावून सांगितले तसेच त्यांच्या शुभहस्ते उत्पन्नाचे दाखले २३,जिवंत सातबारा अर्ज ५ ,फेरफार अर्ज ४,
तसेच यावेळी ग्रामपंचायत पांढरकवडा व शेणगांव कडून नमुना आठ ५,मृत्यू प्रमाणपत्र ७ ,जन्म प्रमाणपत्र ३,मान्यवरांच्या हस्ते वाटप करण्यात आले.
यासोबतच या अभियानाद्वारे रेशन कार्ड अर्ज स्वीकारले १५ ,निवडणूक शाखा विभागामार्फत २ अर्ज स्वीकारण्यात आले .
कृषी विभागामार्फत २६ अर्ज स्वीकारण्यात आले .आरोग्य विभागामार्फत आभा कार्ड ३३,व आयुषमान कार्ड १० वाटप करण्यात आले .
या कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी आयोजक म्हणून प्रकाश सुर्वे मंडळ अधिकारी घुग्घुस,तसेच ग्राम महसूल अधिकारी नवनाथ घोडघासे,मनोज शेंडे, विवेक खांडरे,तसेच विविध विभागांच्या कर्मचारी यांनी अथक परिश्रम घेतले.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक प्रकाश सुर्वे मंडळ अधिकारी घुग्घुस,आभार प्रदर्शन मनोज शेंडे यांनी केले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here