Home Breaking News गडचांदूर नगरपरिषद कडून दूषित पाण्याचा प्रश्न्न गंभीर नागरिकांच्या जीवाशी खेळ सुरु :...

गडचांदूर नगरपरिषद कडून दूषित पाण्याचा प्रश्न्न गंभीर नागरिकांच्या जीवाशी खेळ सुरु : विनोद एन.खंडाळे

162

गडचांदूर नगरपरिषद कडून दूषित पाण्याचा प्रश्न्न गंभीर नागरिकांच्या जीवाशी खेळ सुरु : विनोद एन.खंडाळे



नितेश केराम 
कोरपना तालुक्यातील गडचांदूर शहरात रामकृष्ण हॉटेलपासून वीर बापूराव शेडमाके चौकापर्यंत च्या परिसरात राष्ट्रीय महामार्गांचे काम सुरु असून यामुळे जुन्या नाल्यांचे पाणी थेट नागरिकांच्या बोरिंगमध्ये मिसळत आहे परिणामी नागरिकांना अत्यंत दूषित पाणी मिळत अनेक ठिकाणी पोटदुखी जुलाब उलटी यांसारखे गंभीर आजार उद्धवत आहेत. या समस्येकडे गडचांदूर नगरपरिषदेचे मुख्याधिकारी आणि प्रशासनाचे दुर्लक्ष होत आहे .नागरिकांनी वारंवार तक्रारी करूनही कोणतीही ठोस उपयोजना न झाल्यास संपूर्ण परिसरात संतापाची लाट पसरली आहे. नागरिकांचे म्हणे आहे की शहरात संसगरज्यन्य आजार पसरत असताना प्रशासनाने कोणतीही जबाबदारी घेतलेली नाही.
नगरपरिषद आणि आमदारांनी नागरिकांच्या आरोग्याकडे लक्ष द्यावे अशी जोरदार मागणी होत असून परिस्थिती नियंत्रणाबाहेर जाण्याच्या मार्गांवर आहे स्थानिक प्रशासनाने तात्काळ पावले उचलून नाल्याचे पाणी बंदिस्त करण्याची व्यवस्था करावी अन्यथा नागरिकांना रस्त्यावर उतरून तीव्र आंदोलनाचा इशारा दिला.

खालीलपैकी प्रमुख मागण्या
1) दूषित पाणीपुरवठा तात्काळ थांबवावा
1) नाल्यांचे पाणी बंदिस्त करण्यासाठी              तातडीने काम हाती घ्यावे
3) आरोग्य तपासणी शिबीर आयोजित करावे
4) दोषी प्रशासनिक अधिकाऱ्यांवर कार्यवाही करावी
5) आमदारांनी या गंभीर समस्येवर ठोस भूमिका घ्यावी
गडचांदूर नगरपरिषद जर या समस्येकडे दुर्लक्ष करत राहली तर संपूर्ण शहरात गंभीर आरोग्य संकट निर्माण होईल याची जबाबदारी पूर्ण प्रशासनावर राहील

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here