Home Breaking News मुख्य रस्त्यासाठी पालगाव ग्रामस्थांच्या अल्ट्राटेक सिमेंट कंपनीच्या कार्यालया समोर ठिय्या……

मुख्य रस्त्यासाठी पालगाव ग्रामस्थांच्या अल्ट्राटेक सिमेंट कंपनीच्या कार्यालया समोर ठिय्या……

89

मुख्य रस्त्यासाठी पालगाव ग्रामस्थांच्या अल्ट्राटेक सिमेंट कंपनीच्या कार्यालया समोर ठिय्या……



कोरपण  : गेल्या दोन दशकांपासून हक्काच्या व पक्का मुख्य रस्त्यासाठी पालगाव ग्रामस्थ शासन तथा अल्ट्राटेक सिमेंट कंपनी आवाळपूर मध्ये दत्तक ग्राम असल्याने मुख्य रस्त्याची मागणी करीत आहे.
सिमेंट कंपनीच्या माईन्स गेट ते पालगाव पर्यंत चा रस्ता हा पूर्णता कच्चा असल्याने धूळ व पावसाळ्यात चिखलमय होतो.
गेल्या अनेक वर्षांपासून पालगाव वासियांना ये – जा करण्यासाठी नाहक त्रास करावा लागत आहे.
अल्ट्राटेक सिमेंट कंपनीच्या माईनस परिसराला हा गाव लागून असल्याने माईनस मध्ये वारंवार होणाऱ्या ब्लास्टिंग मुळे गावाला येणाऱ्या काळात धोका होऊ शकतो,
सातत्याने होणाऱ्या ब्लास्टिंगने घरांना भेगा पढत असून गावाच्या पुनर्वसनाचा प्रश्न ही निर्माण होताना दिसून येत आहे.
शासन तथा अल्ट्राटेक सिमेंट कंपनीच्या मॅनेजमेंटशी अनेकदा पत्र व्यवहार करुनही रस्त्याची मागणी पूर्णत्वास आली नसल्याने, व रस्त्याचे काम करण्यासाठी दिलेले आश्वासन पूर्ण न केल्याने,
आज सकाळ पासून पालगाव ग्रामस्थांनी अल्ट्राटेक सिमेंट कंपनीच्या मुख्य कार्यालया समोर ठिय्या मांडला असून, काय तोडगा काढणार याकडे लक्ष लागले आहे एवढेच नव्हे तर दुपारपर्यंत कंपनी व्यवस्थापनाच्या माध्यमातून कसल्याही प्रकारची चर्चा किंवा आश्वासनाची पूर्तता न झाल्यामुळे बाखर्डी पालगाव चे सरपंच अरुण रागीट यांच्या समवेत शेकडो पालगाव वाशी अल्ट्राटेक सिमेंट कंपनीच्या मुख्य कार्यालयाच्या प्रवेशद्वारा समोर शेकडो पुरुष व स्त्रिया ठिय्या म्हणून बसल्याचे चित्र दिसून येत होते मात्र सद्यस्थितीत असलेले कंपनी व्यवस्थापन हे कामगारांच्या बाबतीत व दत्तक गावाच्या विकासाच्या बाबतीत मागील कित्येक वर्षापासून उदासीन असण्याचे चित्र सर्वच दत्तक गावातील ग्रामस्थांना बघायला मिळत आहे .

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here