विदर्भ माध्यमिक शिक्षक संघाची कोरपना तालुका कार्यकारिणी गठित
नितेश केराम
कोरपना : विदर्भ माध्यमिक शिक्षक संघाचे प्रांतीय सरकार्यवाह तथा नागपूर विभागाचे शिक्षक आमदार सुधाकर अडबाले यांच्या मार्गदर्शनात कोरपना तालुका विमाशिसंच्या कार्यकाररिणीचे पुनर्गठन करण्यात आले.
गडचांदूर येथे लोकशाही पद्धतीने तालुका कार्यकारिणीची निवड करून घोषणा करण्यात आली सभेच्या अध्यक्षस्थानी विदर्भ माध्यमिक शिक्षक संघाचे प्रतिय सरकार्यवाह तथा नागपूर विभागाचे शिक्षक आमदार सुधाकर अडबाले हें होते. विमाशि संचे चंद्रपूर जिल्हा उपाध्यक्ष आनंद चलाख हें निवडनूक निर्णय अधिकारी होते.
यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून महामंडळाचे सहकार्यवाह जगदीश जुनघरी विमाशिसंचे चंद्रपूर जिल्हा ( ग्रामीण ) चे अध्यक्ष सुनील शेंरखी कार्यवाह दीपक धोपटे महानगराचे कार्यवाह सुरेंद्र अडबाले प्राचार्य साईनाथ मेसराम जिल्हा समितीचे सल्लागार नामदेव ठेंगणे जिल्हा सहकार्यवाह हरिहर खरवडे व साधूजी बावणे उपस्थित होते.
यात तालुका अध्यक्षपदी गणेश गोडे कार्यवाहपदी प्रशांत दाबेकर कोषाध्यपदी वामन टेकाम गडचांदूर शहरअध्यक्षपदी गजानन बोबडे गडचांदूर शहर कार्यवाहपदी संतोष मुंगले उपाध्यक्ष रत्नाकर लांडे शंकर वागादे रुपेश विटकर टिपले संचालक मुंगळे प्रस्थापिक एच बि मस्की तर आभार प्रदर्शन साधूजी बावणे यांनी केले.