कोरपना तालुक्यात खूनी संघर्ष या पक्षाच्या जिल्हाध्यक्षासह पाच जण तुरुंगात

8

कोरपना तालुक्यात खूनी संघर्ष या पक्षाच्या जिल्हाध्यक्षासह पाच जण तुरुंगात



नितेश केराम
कोरपना तालुक्यातील कन्हाळगाव येथे शेतीच्या वादातून झालेल्या मारहानीत गंभीर जखमी झालेल्या शेतकऱ्याचा उपचारादरम्यान मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना घडली आहे या प्रकरणात शेतकरी संघटनेच्या जिल्हाध्यक्षासह पाच जणांना अटक करण्यात आली असून ्न्यायलयाने त्यांना 14 दिवसांची ्न्यायालयीन कोठडी सुनावली आहे
ही घटना बुधवार 11 जून सकाळी 10 वाजताच्या सुमारास कन्हाळगाव येथे घडली शेतकरी पुंडलिक कारेकार ( रा कोरपना ) यांच्यावर स्थानिक वादातून झालेल्या हल्यात गंभीर दुखापत झाली होती त्यांना तातडीने चंद्रपूर येथील रुग्णालयात दाखल करण्यात आले मात्र गुरुवार 12 जून राजी उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाला या हल्यात पुंडलिक कारेकार यांचा मुलगा जगदीश आणि किशोर हें देखील जखमी झाले आहेत घटनेचा तक्रार कोरपना पोलीस ठाण्यात दाखल करण्यात आली असून भारतीय न्याय सहीता 2023 अंतर्गत कलम 352 351(2 )118(2)191(2)290 189(2)189(1) नुसार गुन्हा नोंदविण्यात आला होता मात्र कारेकार यांच्या मृत्यूनंतर सर्व आरोपीवर कलम 103 अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे
या प्रकरणात शेतकरी संघटनेचे जिल्हाध्यक्ष अरुण पाटील नवले बबन गारघाटे विजय मसे अरविंद मसे व राजेश नवले यांना कोरपना पोलिसांनी अटक केली असून शुक्रवारी 13 जून रोजी यांना कोरपना ्न्यायालयात हजर केले असता न्यायालयाने 14 दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावली आरोपीना चंद्रपूर तुरुंगात हालवण्यात आले आहे

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here