जबर चोरी करणारा आरोपी रामनगर गुन्हे शोध पथकाच्या अवघ्या २४ तासात जाळयात.

7

जबर चोरी करणारा आरोपी रामनगर गुन्हे शोध पथकाच्या अवघ्या २४ तासात जाळयात.



चंद्रपुर : दिनांक १३/६/२०२५ रोजी फिर्यादी नामे मधुराम तुलसींग कोल्हा, वय ३४ वर्ष रा. कोडाखुरी ता. द्रुककोंड जि. कांकेर (छत्तीसगड) यांनी पोलीस स्टेशन रामनगर येथे रिपोर्ट दिला की तो तामीलनाडु येथुन मजुरीचे काम करून दिनांक ११/६/२०२५ रोजी तिरपूर रेल्वे स्टेशन निघुन दिनांक १२/६/२५ रोजी सकाळी १०/०० वा. चंद्रपूर रेल्वे स्टेशन येथे पोहचला व त्याचे गावाकडे जाणारी बस ही दिनांक १३/६/२५ चे सकाळी ५/०० वा. असल्याने फिर्यादी हे दिनांक १२/६/२५ रोजी रात्रो ८/०० वा. दरम्यान सपना टॉकीज जवळ जलनगरवार्ड चंद्रपूर येथे पाणी बॉटल घेण्यास गेला असता एक अज्ञात इसमाने त्याचे मागे येवून त्याचे तोंडाला दाबुन त्याचे खिशातुन ५०,००० रू हिस्कावून नेले अशा फिर्यादीचे तोंडी तक्रारीवरून पोस्टे रामनगर येथे अप क. ४७०/२०२५ कलम ३०९ (६) बि.एन. एस. अन्वये गुन्हा नोंद करण्यात आला.
सदर गुन्हयाची माहिती रामनगर गुन्हे शोध पथकाला मिळताच त्यांनी तात्काळ घटनास्थळ गाठुन गुन्हयातील चोरीस गेलेल्या मालाचा व अज्ञात आरोपीचा गुप्त बातमीदार व तांत्रीक दृष्टया तपास केला असता त्या आधारावर मिळालेल्या माहितीनुसार आरोपी शेख जुबेर शेख कादर, वय ३३ वर्ष, रा. रहेमतनगर चंद्रपूर हयास अटक करून त्याचे ताब्यातुन गुन्हयात चोरीस गेलेली नगदी रोख ५०,००० रू हस्तगत करण्यात आली. पुढील तपास सपोनी निलेश वाघमारे पोस्टे रामनगर हेकरीत आहे.
सदरची कार्यवाही पोलीस अधिक्षक . मुमक्का सुदर्शन सा. चंद्रपूर मा. अपर पोलीस अधिक्षक रिना जनबंधु मॅडम, उपविभागीय पोलीस अधिकारी श्री सुधाकर यादव सा. यांचे मार्गदर्शनाखाली वरीष्ठ पोलीस निरीक्षक असीफराजा शेख, तसेच गुन्हे शोध पथक रामनगर चे प्रमुख सपोनी देवाजी नरोटे, सपोनी हनुमान उगले, सपोनी निलेश वाघमारे, पोहवा/०९ पेत्रस सिडाम, पोहवा / २२७३ शरद कुडे, पोहवा /१४४६ सचिन गुरनुले, पोहवा / ११६५ आनंद खरात, पोहवा / २४५४ प्रशांत शेंद्रे, पाहवा / २४३० लालु यादव, पोहवा ५६६ जितेंद्र आकरे मपोहवा / ८६२ मनिषा मोरे पोशि / ८२५ हिरालाल गुप्ता, पोशि८४७ रविकुमार ढेंगळे, पोशि /६३० प्रफुल पुष्पलवार, पोशि/८८१ संदीप कामडी, पोशि १२३०/ पंकज ठोंबरे, पोशि २२९१/ सुरेश कोरवार मपोशि / २६५३ब्युल्टी साखरे यांनी कार्यवाही केली.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here