कोरपना नारंडा भोयगाव बस सेवा सुरु

6

कोरपना नारंडा भोयगाव बस सेवा सुरु


नितेश केराम
कोरपना नारंडा भोयगाव मार्गे चंद्रपूर बस सेवा सुरु करण्यात आली असून यासाठी राजुरा विधानसभेचे आमदार देवराव भोंगळे यांच्या नेतृत्वात भारतीय जनता युवा मोर्चा जिल्हा उपाध्यक्ष आशिष ताजने यांनी महाराष्ट्र परिवहन मंडळाकडे निवेदन देऊन वारंवार पाठपुरावा केला होता याला यश प्राप्त झाले असून कोरपना नारंडा भोयगाव मार्गे चंद्रपूर बस सेवा सुरु करण्यात आली आहे ही बस सुरु झाल्याने चंद्रपूर जिल्ह्यातील शेव टच्या टप्यात असलेल्या कोरपना तालुक्यातील कोडशी ( बु ) कोडशी ( खु ) गांधीनगर हेटी शेरज ( बु ) शेरज ( खु )माथा पिपंरी लोणी वनसदी नारंडा वानोजा कळोली ( खु )अंतरगाव सांगोळा हिरापूर विरूर गाडेगाव बोरगाव इरई भरोसा भोयगाव इत्यादी गावातील नागरिकांना फायदा होणार आहे
सदर बस सेवा सुरु झाल्याने कोरपना तालुक्यातील नागरिकांना कमी खर्चात आणि कमी वेळात चंद्रपूर जाणे अगदी सोपे झाले कोरोनापासू या मार्गांवर एकही बस सुरु नव्हती त्यामुळे जिल्ह्याच्या ठिकाणी जाण्यास नागरिकांना राजुरा मार्गे फेरा मारून जावे लागत होते त्यामुळे नागरिकांना आर्थिक शारीरिक मानसिक त्रासाला समोर जावे लागत होते बस सुरु व्हावी अशी मागणी परिसरातील नागरिकांनी अनेकदा केली मात्र सकारात्मक काही घडले नाही शेवटी याची दखल घेत ताजने यांनी सदर बससाठी पाठपुरावा केला आणि यात ते यशस्वी झाले यावेळी तालुक्यातील नारंडा गावात बसचे पूजन करून स्वागत करण्यात आले यावेळी भारतीय जनता युवा मोर्चाचे जिल्हाध्यक्ष आशिष ताजने वानोजा येतील सरपंच दिलीप पाचभाई नारंडा उपसरपंच बाळा पावडे काढोली ( खु ) उपसरपंच विनोद डोहे उत्तमरावं मोहितकर प्रवीण हेपत संतोष वानढरे अनिल चांदेकर प्रफुल पंदिलवार मंगल खाडे विनोद पेटकर प्रमोद शेंडे आशिष ढुमने मंगल निकोडे सचिन काकडे सचिन उरकुडे मीनाथ लांडगे आशोक डोहे गणेश मोहुर्ले यांची उपस्थिती होती यावेळी वाहक व चालकाचे पुष्पगुछ देऊन स्वागत करण्यात आले तसेच सदर बस सुरु झाल्यामुळे परिसरातील गावातील प्रवासी नागरिकांमध्ये आनंदाचे वातावरण आहे बस सेवा सुरु केल्याबद्दल राजुरा विधानसभा क्षेत्राचे आमदार देवरावदादा भोंगळे व महाराष्ट्र राज्य परिवहन मंडळाचे या ठिकाणी नागरिकांनी आभार वेक्त केले
चंद्रपूरवरून नारंडा मार्गे कोरपनासाठी सकाळी 8/30 वाजता व सयंकाळी 5/30 वाजता व कोरपनावरून नारंडा मार्गे सकाळी 10/30 वाजता बस सेवा सुरु राहणार आहेत या सेवेचा लाभ घ्यावा अशी विनंती वजा आवाहन आशिष ताजने यांनी केले

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here