मौजा दारव्हा येतील नगरपरिषद चे दुर्लक्ष
नितेश केराम
मौजा दारव्हा येतील येत्या काही दिवसापासून सुरु असलेल्या पावसाळ्यामुळे गोपाल नगर मधील काही घरात पाणी शिरल्यामुळे काही घरांची झाली नुकसान याची नुकसान भरपाई करून देणार तरी कोण! असा प्रश्न उपस्थित झाला गोपाल नगर मधील काही रहिवाशांनीं कॉल करून सामाजिक कार्यकर्ते पवन भाऊ शेबे यांची चर्चा केली
दिवसभर झालेल्या मुसळधार पावसामुळे शहरातील नाल्याला पूर आला आणि त्या पुराचे पाणी काही लोकांच्या घरात शिरले त्यामुळे गोपाल नगर मधील नागरिक चिंतेत आहे पावसाळा लागण्याआधी नगरपरिषेने नाल्याचे खोलीकरण केले असते तर नागरिकांवर ही वेळ आली नसती अनेक घरांमध्ये पाणी शिरल्याने नागरिकांचे मोठे नुकसान झाले आहे भिंती आणि छत खराब झाले असून घरात ठेवलेल्या वस्तूंचेही नुकसान झाले आहे नागरिकांना घराबाहेर पडावे लागले कारण घरात पाणी अहिरल्यामुळे खूप साऱ्या समस्या निर्माण झाल्या गेल्या आठ ते दहा दिवसापासून नागरिकांवर घरातच दम कोंडी करून राहण्याची वेळ आली आहे प्रशासनाने तातडीने मदतीचा हात द्यावा अशी मागणी नागरिकांकडून केली जात आहे










