वणी तालुक्यात सर्व शेतकरी संघटने तर्फे विविध मांगण्यासाठी उपविभागीय अधिकारीला निवेदन दिले
वणी उपविभागीय अधिकारीच्या माध्यामातुन मुख्यमंत्रीना निवेदन पाठवण्यात आले
वणी : नागपूर येथे सुरु असलेल्या आंदोलनात शेतकयांच्या विविध मागण्या साठी सुरु असलेल्या मागण्याची त्वरित दखल घेऊन शेतकरी कर्ज माफी व इतर मागण्या विलंब न करता मागण्या पूर्ण करण्यात यावा आगष्ट ते सप्टेंबर २०२५ मध्ये झालेल्या अतिवृष्टी मुळे शेतकर्याचे सोयाबीन व कापूस पूर्णपणे नष्ट झाले आहे,
आज सोयाबीन चे उत्पादन एकरी २/३ क्विंटल झालेले आहे, आणि ते पण बाजारात विक्री केल्यास १०००/१५०० रु. दराने विक्री होत आहे. आणि कापूस तर आज पर्यंत शेतकऱ्याच्या घरात आलेला नाही. आणि जो थोडा फार आला २ ते ३ क्विंटल आला तो पण खवडी असल्यामुळे बाजारात व्यापारी घेण्यास तयार नाही, आणि जे थोडी फार आशा होती ते पण दोन दिवसा पासून आंध्राप्रदेशामध्ये सुरु असलेल्या चक्रीवादळाचा फटका हा संपूर्ण वणी तालुक्यातील कापूस पिकांना बसल्यामुळे वेचणीस आलेला कापूस हा जमीन दोस्त झाला असल्यामुळे आता शेतकरी पूर्णपणे हतबल झाला असल्यामुळे शेतकर्यांना भरीव मदतीची गरज आहे.
१) शेतकर्यांची संपूर्ण कर्जमाफी करून नवीन कर्ज पुरवठा करण्यात यावा. २) हेक्टरी ५००००/- रु. ३ हेक्टर पर्यंत मदत देण्यात यावी. ३) रबी पिकासाठी हेक्टरी २००००/- रुपयाचे अनुदान देण्यात यावे.
सरकार ने दिलेली ८५००/- रु. हेक्टरी मदत हि तुटपुंजी असल्या मुळे शेतकरी त्या मदतीने सावरू शकत नाही, नाईलाजास्त शेतकर्यांना संपूर्ण कुटुंबा सहित आत्महत्या केल्याशिवाय पर्याय उरणार नाही.
नागपूर मध्ये सुरु असलेल्या आंदोलनाच्या मुख्य मागण्या शासनाने कोणत्याही अटी शर्ती न लावता त्वरित मागण्या मान्य कराव्या, तसे न झाल्यास महाराष्ट्रातील सर्व शेतकरी राज्य भर आंदोलन करून नागपूर कडे जेल भरो आंदोलन करण्या करिता आगेकूच करण्यास तयार आहे. आंदोलनात असे काही झाल्यास सर्वस्वी जबाबदारी शासन आणि प्रशासनावर राहील.