Home Breaking News RCCPL MP BIRLA कंपणी कामगारांचा मुकुटबन येथे बेमुदत कामबंद आंदोलनाचा तिसरा दिवस

RCCPL MP BIRLA कंपणी कामगारांचा मुकुटबन येथे बेमुदत कामबंद आंदोलनाचा तिसरा दिवस

96

RCCPL MP BIRLA कंपणी कामगारांचा मुकुटबन येथे बेमुदत कामबंद आंदोलनाचा तिसरा दिवस



.क्षेत्रातिल विवीध गावचे सरपंच व राजकिय पक्षांचा वाढता पाठींबा.परंतु कंपणीचा प्रतिसाद नाही


*वणी– मुकुटबन येथील कार्यरत RCCPL MP BIRLA या सिमेंट कंपनीमधिल काम करणारे कामगारांच्या समस्यांना घेऊन दि.6 नोव्हें.पासुन कंपणीमध्ये स्थापीत जनरल ईंडस्ट्रीज कामगार युनियन(आयटक)चे अध्यक्ष तथा वणी विधानसभा क्षेत्राचे प्रखर व लढाऊ नेत्रुत्व कॉ.अनिल हेपट यांचे नेत्रुत्वात कामगारांनी कामबंद आदोलन सुरु केले.कामगारांनी या आंदोलनाला 100% प्रतिसाद देऊन आंदोलन तिसरया दिवशीही सुरू आहे.आंदोलनाला जनतेतून प्रचंड पाठींबा वाढत आहे.यामध्ये भाकप झरी तालुका,मुकुटबनच्या सरपंच सौ.मिनाताई आरमुरवार,शेतकरी संघटनेचे झरी तालुका नेते श्री.बंडु पारखी,विवीध आदीवासी संघटनांचे नेते श्री.विठ्ठल उईके,श्री.मारोतराव कुसराम,शिवसेना (शिंदे)चे नेते श्री.चंद्रकात घुगुल,बाळु चेळे,भाजपचे झरी तालुकाध्यक्ष श्री.घुगुल,दिग्रसचे सरपंच निलेश यल्टीवार,सिंधी वाढोणाचे सरपंच श्री.निखाडे,उमरीचे सरपंच तथा सरपंच संघटनेचे अध्यक्ष जिल्हाध्यक्ष विनोद माथनकर,मानकीचे सरपंच श्री.पिंपळकर,वरझडीचे सरपंच सौ.भोयर,मेंढोलीचे सरपंच सौ.ढवस आदींनी आदोलननात येऊन सक्रिय पाठींबा दिला,अधिकृत पत्र दिले.सर्वांनी सांगीतले कि जर कंपणी मग्रुरपणाने वागत असेल आणि कामगारांना न्याय देत नसेल तर जनक्षोब वाढेल आणी याची जबाबदारी कंपणीची राहील त्यामुळे कंपणी प्रशासनाने कामगाराचे हिताचे दृष्टिने सकारात्मक प्रतिसाद द्यावा अशी याप्रसंगी मागणी केली. तिसरया दिवशी सुरु असलेल्या आंदोलनाचे नेत्रुत्व जननेते कॉ.अनिल हेपटसह,अनिल घाटे,मोरेश्वर कुंटलवार,दिनेश शिटलवार,पंढरी नांदेकर,प्रविण कुळेकर,अनिल मोंडे,महादेव मेश्राम,कवडु केळझरकर,रोषन चामाटे,कलीम शेख,निरज खैरकर,अक्षय पुल्लीवार आदीं करीत आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here