सर्वांगीण विकास हाच भाजपा सरकारचा दृढ संकल्प —आमदार देवराव भोंगळे*
शेणगाव येथील काँग्रेसच्या अनेक कार्यकर्त्यांचा भाजपात जाहीर पक्षप्रवेश
राजुरा: शहरासोबतच आता ग्रामीण भागातही विकासकामांना गती मिळाली आहे. रस्ते, पाणी, आरोग्य, शिक्षण, शेतीसाठी ठोस धोरणे राबविण्याचा आमचा प्रयत्न आहे. ग्रामीण भागातील शेतकरी, युवक, महिला आणि समाजातील गरीब घटकांना न्याय मिळवून देणे तसेच सर्वांगीण विकास करणे हाच भाजपा सरकारचा दृढ संकल्प असल्याचे प्रतिपादन आमदार देवराव भोंगळे यांनी केले.
जिवती तालुक्यातील शेणगाव येथील काँग्रेसच्या अनेक कार्यकर्त्यांनी आमदार देवराव भोंगळे यांच्या नेतृत्वावर विश्वास ठेवून राजुरा येथील भाजपा जनसंपर्क कार्यालयात (दि.११) ला भाजपात जाहीर पक्षप्रवेश केला यावेळी आमदार भोंगळे बोलत होते.
आमदार भोंगळे पुढे म्हणाले, भारतीय जनता पक्षाचा विकासाचा प्रवाह आणखी वेगाने पुढे जात असताना नवीन कार्यकर्त्यांनी भाजपा सरकारच्या विकासाभिमुख धोरणांवर विश्वास दाखवून शेणगाव येथील काँग्रेसमधील अनेक कार्यकर्त्यांनी भाजपा पक्षात प्रवेश करून भाजपावरचा जनतेचा विश्वास अधिकच दृढ केला आहे. असेही आमदार भोंगळे यांनी सांगितले.
यावेळी भाजपमध्ये पक्षप्रवेश केलेल्या नवप्रवेशित कार्यकर्त्यांमध्ये प्रल्हाद राठोड, प्रेमदास राठोड, राम राठोड, शंकर पवार यांचा समावेश आहे.
याप्रसंगी भाजयुमोचे जिल्हाध्यक्ष महेश देवकते, जिल्हा उपाध्यक्ष केशव गिरमाजी, भीमराव पवार, अजय खंदारे, संग्राम बाजगीर, नर्सिंग हामने, विठ्ठल केजगीर, गोविंद केजगीर, दिगंबर कोल्हे, बालाजी मुगावे , बालाजी बिराजदार, संभाजी शिंदे यांचेसह भाजपा कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.