गढ़चिरोली वडसा येथे सैकड़ों पक्षातील अधिकारी व कार्यकर्ता कांग्रेसमध्ये सामील
वडसा (गडचिरोली) येथे विविध पक्षातील शेकडो पदाधिकारी तथा कार्यकर्त्यांनी काल मोठ्या उत्साहात काँग्रेस पक्षात प्रवेश केला. यामध्ये विशेषतः वनिता अशोक नाकतोडे, भारती संदीप दहिकर, बिएसपीच्या आशाताई दहीवले, सामाजिक कार्यकर्ते अमोल बुराडे, आश्विन मुळे, महादेव ढोरे, सुरेखा ढोरे, आशा झोडे, तसेच शिवसेनेचे तालुकाध्यक्ष नंदू चावला, जसपाल चावला यांच्यासह शेकडो कार्यकर्त्यांनी उस्फूर्तपणे काँग्रेस पक्षात प्रवेश केला.
काँग्रेस हा जनतेच्या प्रश्नांना केंद्रस्थानी ठेवणारा, संविधान आणि लोकशाही मूल्यांवर ठाम राहणारा पक्ष आहे. सामाजिक न्याय, सर्वसमावेशक विकास, समानतेची हमी आणि दुर्बल घटकांना संरक्षण ही काँग्रेसची विचारधारा आजही जनतेला आपली वाटते.
काँग्रेसचे नेतृत्व हे सत्तेसाठी नव्हे तर लोकशाही वाचवण्यासाठी, संविधान अबाधित ठेवण्यासाठी, आणि सामान्य माणसाच्या हक्कांसाठी संघर्ष करणारे नेतृत्व आहे. या विश्वासातूनच इतक्या मोठ्या संख्येने कार्यकर्त्यांनी काँग्रेसमध्ये प्रवेश करत पक्षाला अधिक बळकट करण्यासाठी काँग्रेसचा हात धरला. या सर्वांचे पक्षात स्वागत करून सर्वांना पुढील राजकीय वाटचालीस शुभेच्छा दिल्या.