Home Breaking News मानसिक स्वास्थ्य खराब असलेल्या अनोळखी स्त्री जातीचे मृतक महीलेचा शोध होणेबाबत शोधपत्रिका

मानसिक स्वास्थ्य खराब असलेल्या अनोळखी स्त्री जातीचे मृतक महीलेचा शोध होणेबाबत शोधपत्रिका

50

मानसिक स्वास्थ्य खराब असलेल्या अनोळखी स्त्री जातीचे मृतक महीलेचा शोध होणेबाबत शोधपत्रिका

शिरपुर: पो स्टे शिरपुर भाग मर्ग क. ४७/२५ कलमे १९४ बिएनएसएस प्रमाणे मतावेळ दा.ता.वेळ दि. १३/१२/२५ चे १२/५८ वा घटनास्थळ पिंपळगाव ते उकणी रोडचे बाजुला वर्णन सदर मृतक महीला ही पिंपळगाव ते उकणी रोडवर रोडचे बाजुला निंबाचे झाडाजवळ मयत अवस्थेत दि. १३/१२/२५ चे सकाळी ८/०० वा पुर्वी मिळुन आली.वय अंदाजे ६५ वर्ष रंग सावळा उंबी अंदाजे ५ फुट ०१ इंच बांधा सडपातळ पोशाख अंगात लाल रंगाचे स्वेटर व हिरव्या रंगाचे लुगडे असलेली. केस काळे पांढरे, हातात बांगडया होत्या

हकीकत अशा प्रकारे आहे की, यातील फिर्यादी नामे सौ चंद्रकला शंकर राजुरकर वय ५३ वर्ष व्यवसाय पोलीस पाटील रा बोरगाव ता वणी यांनी पो स्टे ला जबानी रिपोर्ट दिला की, आज दि १३/१२/२५ चे सकाळी ०८/०० वा दरम्यान माहीती मिळाली की, पिंपळगाव ते उकणी रोडचे बाजुला निंबाचे झाडाजवळ एक मानसिक स्वास्थ्य खराब असलेल्या स्ञी जातीचे प्रेत वय अंदाजे ६५ वर्ष असे थंडीने अकडुन असलेले व दोन्ही हात थंडीने कडक असलेले व अंगात लाल रंगाचे स्वेटर व हिरव्या रंगाचे लुगडे घालुन असलेले स्त्रीचे प्रेत मृत अवस्थेत रोडचे बाजुला पडुन असल्याची माहीती मिळाली वरून सदर ठिकाणी जावुन पाहीले असता वर नमुद प्रमाणे एक मानसिक स्वास्थ्य खराब असलेल्या अनोळखी स्वी जातीचे प्रेत थंडीने अखडलेले स्थितीत मयत अवस्थेत मिळुन आलेले मिळुन आले.

सदर अनोळखी मृतक महिला वय अंदाजे ६५ वर्ष ही थंडीने गारठुन त्यामध्ये तिचा मृत्यु झालेला असवा. अशा रिपोर्ट वरून पो स्टे शिरपुर येथे नमुद मर्ग दाखल करण्यात आला आहे. मृतकाचे प्रेताची पाहणी करून ओळख पटविणे करीता प्रयत्न केले असता अदयाप पावेतो प्रेताची ओळख पटलेली नाही. मृतकाचे वरील प्रमाणे वर्णन असुन अशा वर्णनाचे मृतक महीलेची ओळख पटल्यास किंवा त्याबाबत काही माहीती मिळाल्यास तसेच सदर वर्णनाची व्यक्ती आपले हददीतील असुन हरविलेली असल्यास पो स्टे शिरपुर जि यवतमाळ येथे संपर्क साधावा.

टिप खालील क्रमांकावर संपर्क साधावा.

संतोष मनवर सा ठाणेदार पो स्टे शिरपुर मो.नं. ९८८१३०१९०१

पोउपनि. रावसाहेब बुधवत मो.नं. ७४९९४४८८७४

पोहवा/१७३३ सुनिल दुबे मो क ९५११२३१४४३

तपास अधिकारी

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here