Home Breaking News ग्रामपंचायत कार्यालय दारुड्यांचा अड्डा

ग्रामपंचायत कार्यालय दारुड्यांचा अड्डा

34

ग्रामपंचायत कार्यालय दारुड्यांचा अड्डा

नितेश केराम
कोरपना तालुक्यातील नारंडा येतील ग्रामपंचायत कार्यालयाच्या वरांडा सद्या दारुड्यांचा अड्डा बनल्याचे धक्कादायक चित्र समोर आले आहे काही नागरिक ग्रामपंचायत कार्यालयातच दारू पिऊन बेशुद्ध अवस्थेत सरांड्यात आराम करत असल्याचे प्रकार सातत्याने घडतं असून यामुळे प्रशासनाची प्रतिमा मलीन होत आहे
ग्रामपंचायत कार्यालय हें गावातील सर्वसामान्य नागरिकांच्या कामासाठी असते मात्र याच ठिकाणी काही जण खुलेआम दारू पिऊन पडून राहत असल्याने महिला वृद्ध व विध्यार्थी यांना कार्यालयात जाण्यास भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे भरदिवसा असे प्रकार घडतं असताना ग्रामपंचायत प्रशासन सरपंच व सचिव यांचे दुर्लक्ष स्पष्टपणे दिसून येत आहे स्थानिक नागरिकांची संताप करत सांगितले की यापूर्वीही अशा प्रकारांच्या तक्रारी करूनही कोणतीस ठोस कारवाई करण्यात आलेली नाही ग्रामपंचायत कार्यालयात शिस्त स्वच्छता व सुरक्षिता राखण्याची जबाबदारी प्रशासनाची असताना दारुड्याना मोकळे रान देण्यात येत असल्याचा आरोप होत आहे
या प्रकारामुळे ग्रामपंचायत कार्यालयाची बदनामी होत असून तात्काळ कठोर कारवाई करण्याची मागणी गावाकऱ्यांनी केली आहे संबंधित दारुड्यावर गुन्हा दाखल करावा तसेच कार्यालय परिसरात सिसिटीव्ही पहारेकरी व पोलिसांचा नियमित गस्त वाढवावी अशी मागणी जोर धरू लागली आहे
प्रशासन यावर काय कारवाई करणार
हा प्रश्न आता सम्पूर्ण गावात चर्चेचा विषय बनला आहे

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here