Home Breaking News चंद्रपूर महानगरपालिका निवडणूक : एमआयडीसी बंगाली कॅम्प परिसरातील महत्त्वाचे रस्ते तीन दिवस...

चंद्रपूर महानगरपालिका निवडणूक : एमआयडीसी बंगाली कॅम्प परिसरातील महत्त्वाचे रस्ते तीन दिवस बंद

64

चंद्रपूर महानगरपालिका निवडणूक : एमआयडीसी बंगाली कॅम्प परिसरातील महत्त्वाचे रस्ते तीन दिवस बंद



चंद्रपूर | प्रतिनिधी
चंद्रपूर शहर महानगरपालिका सार्वत्रिक निवडणूक २०२५–२०२६ चा कार्यक्रम जाहीर झाल्याने प्रशासन सज्ज झाले आहे. या अनुषंगाने दिनांक १५ जानेवारी २०२६ रोजी होणाऱ्या मतदान प्रक्रियेसाठी एम.आय.डी.सी. बंगाली कॅम्प चौक परिसरातील झोन क क्रमांक ०३ येथे स्ट्रॉंग रूम तयार करण्यात आली आहे.
स्ट्रॉंग रूममध्ये मतदानाच्या मतपेट्या ने-आण करण्यासाठी १४ जानेवारी ते १६ जानेवारी २०२६ या कालावधीत निवडणूक वाहने व बसेसची ये-जा मोठ्या प्रमाणात होणार आहे. त्यामुळे वाहतुकीस अडथळा निर्माण होऊ नये व कायदा-सुव्यवस्था अबाधित राहावी, यासाठी पोलीस प्रशासनाने महत्त्वपूर्ण निर्णय घेतला आहे.
पोलीस अधीक्षक मा. मुम्मका सुदर्शन (भापोसे) यांनी मुंबई पोलीस अधिनियम १९५१ च्या कलम ३३(१)(ब) अंतर्गत प्राप्त अधिकारांचा वापर करत रस्ते बंद ठेवण्याची अधिसूचना जारी केली आहे.
🚫 हे रस्ते राहणार बंद
खालील मार्गांवर सर्व प्रकारच्या वाहनांची वाहतूक पूर्णतः बंद राहणार आहे —
1️⃣ शिवशक्ती सिमेंट प्रोडक्शन ते हिरामोती फर्निचर दुकानपर्यंत
2️⃣ हिरामोती फर्निचर दुकान ते आर्यन के स्टोअर शॉपपर्यंत
3️⃣ मराठा फेब्रीकेशन दुकान ते एम.एस.सी.बी. कार्यालयाच्या आतील परिसराकडे जाणारा रस्ता
👉 नागरिकांनी या मार्गांवर वाहने पार्क करू नयेत, असे स्पष्ट निर्देश देण्यात आले आहेत.
⏰ कधीपासून कधीपर्यंत?
📌 १४ जानेवारी २०२६ रोजी सकाळी ८ वाजल्यापासून
📌 १६ जानेवारी २०२६ रोजी सायंकाळी ६ वाजेपर्यंत
ही अधिसूचना लागू राहणार असून, परिस्थितीनुसार त्यात बदल होऊ शकतात.
⚠️ महत्त्वाची सूचना
सदर परिसरात राहणाऱ्या नागरिकांव्यतिरिक्त इतर सर्व नागरिकांसाठी हे रस्ते पूर्णतः बंद असतील.
🤝 पोलीस प्रशासनाचे आवाहन
निवडणूक प्रक्रिया शांततेत पार पाडण्यासाठी आणि कायदा-सुव्यवस्था राखण्यासाठी नागरिकांनी पोलीस प्रशासनाला सहकार्य करावे, असे आवाहन करण्यात आले आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here