Home Breaking News प्रतिबंधीत नायलॉन मांजा विक्री करणारे विरुध्द कारवाई

प्रतिबंधीत नायलॉन मांजा विक्री करणारे विरुध्द कारवाई

45

प्रतिबंधीत नायलॉन मांजा विक्री करणारे विरुध्द कारवाई

नायलॉन मांजा चे ५८ नग प्लॉस्टीक चक्री किं. अं.६१,४००/- रु. चा माल जप्त

स्थानिक गुन्हे शाखा, चंद्रपूर ची कामगिरी

दिनांक १३ जानेवारी, २०२६ रोजी स्थानिक गुन्हे शाखा चंद्रपूर चे पथकाने बातमीदारांकडुन मिळालेल्या गोपनिय माहिती चे आधारे पो.स्टे. रामनगर हद्दीत नामे गौरव गोटेफोडे रा. रामनगर चौक, सेंट मायकल शाळेजवळ चंद्रपूर याचे मालकीचे अष्टविनाय पतंग सेंटर येथे छापा टाकला टाकुन दुकानात पंचासमक्ष झडती घेतली असता त्याचे दुकानात पतंग उडविण्याकरीता वापरण्यात येणारा, मानवी जिवितास आणि पर्यावरणास धोकादायक असलेला प्रतिबंधीत नायलॉन मांजा असलेल्या ५८ नग चक्री किं.अं.६१,४००/- रु. चा माल अवैधरित्या विक्री करीता साठा करुन ठेवला असुन सदर प्रतिबंधित नायलॉन मांजा हा नामे सारंग राहुलगडे रा. बंगाली कॅम्प बल्लारशाह याने आणुन दिल्याचे सांगितलयाने मिळुन आलेला सदर मांजा चक्री जप्त करुन दोघांविरुध्द पोस्टे रामनगर कलम २२३, २९२, ४९ भारतीय न्याय संहिता-२०२३ सहकलम ५, १५ पर्यावरण संरक्षण अधिनियम अन्वये गुन्हा नोंदविण्यात आला असुन पुढील तपास रामनगर पोलीस करीत आहे.
सदरची कारवाई श्री मुम्मका सुदर्शन पोलीस अधीक्षक चंद्रपूर, श्री ईश्वर कातकडे अपर पोलीस अधीक्षक चंद्रपूर यांचे मार्गदर्शनात स्थानिक गुन्हे शाखा चंद्रपूर चे पो.नि. श्री अमोल काचोरे यांचे नेतृत्वात पोउपनि श्री विनोद भुरले, पोउपनि श्री सुनिल गौरकार, पोहवा सुभाष गोहोकार, सतिश अवथरे, रजनीकांत पुठ्ठावार, दिपक डोंगरे, इमरान खान, हिरालाल गुप्ता, किशोर वाकाटे, शशांक बादामवार सर्व स्थानिक गुन्हे शाखा चंद्रपूर यांनी केली आहे.
नागरीकांना आवाहन करण्यात येते की, जर कोणीही नायलॉन मांजा वापर करतांना किंवा विक्री करतांना आढळून आल्यास त्याबाबतची माहिती तात्काळ चंद्रपूर पोलीस दलाचे WhatsApp No. 7887890100 आणि 112 यावर कळवावे. माहिती देणाऱ्यांचे नांव गोपनिय ठेवण्यात येईल.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here