कोरपना तालुक्यातील आदिवासी बहुल गावाला जोडणाऱ्या डांबऱीकरणं रस्त्यांना मंजुऱी देऊन निधी उपलब्ध करून द्या
आमदार देवराव भोंगळे यांना प्रमोद कोडापे महामंत्री भाजपा आदिवासी आघाडी यांची पत्राद्रारे मागणी
नितेश केराम
कोरपना तालुक्यातील आदिवासी बहुल भागातील रस्त्यांना मंजुऱी देऊन डांबऱीकरणं करणेकरिता निधी उपलब्ध करून देण्यात यावा या मागणीचे पत्र आमदार देवरावदादा भोंगळे यांना दि 2/2/2026 ला चंद्रपूर येतील जिल्हाधिकाऱी कार्यालयातील वीस कलमी सभागृहात भाजपा आदिवासी आघाडी चे महामंत्री तथा कोषाध्यक्ष कोरपना तालुका प्रमोद कोडापे यांनी पत्राद्रारे आदिवासी क्षेत्रातील रस्त्यांना डांबऱीकरण करणेकरिता निधी उपलब्ध करून देण्याची मागणी केली व या मागणीला प्रतिसाद देत आमदार देवराव भोंगळे यांनी सदर रस्त्याकरिता निधी उपलब्ध करून देणेसंदर्भात आत्मविश्वासित केले सदर रस्त्यामध्ये प्रामुख्याने 1 कुसळफाटा ते बोरगाव खु (2) सावलहीरा ते घाटराई माता देवस्थान (3) कन्हाळगावं चनई ( बु ) मांडवा (4) रुपापेठ रोड (6) सावलहीरा ते थिप्पा (7) पारडी ते रूपापेठ रोड (8) रामपूर ते निजामगोंदी रोड (9) हिरापूर पालगाव रोड डांबऱीकरणं करणे 2,5 कीं मी (10) हिरापूर ताडाचे झाडापासून जाणारा पांदण रस्ता खडीकरणं करणे (11) हिरापूर कढोली पांदण रस्ता खडीकरणं करणे कोरपना तालुक्यातील सदर रस्त्याचा यामध्ये आहेत